एक्स्प्लोर

Breaking News LIVE : महिलेला गुप्तांग दाखवून विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून सुनावली शिक्षा

Breaking News LIVE Updates, 05 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : महिलेला गुप्तांग दाखवून विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून सुनावली शिक्षा

Background

Maharashtra ZP Panchayat Samiti Elections 2021 : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीची रणधुमाळी, आज सहा जिल्ह्यांमध्ये मतदान
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. आज मतदान तर आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

MPSC Exam | राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. 2  जानेवारी, 2022 रोजी  290 पदांसाठी परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत येणारे एकूण 290 पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येणार आहे.  5 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते 25 ऑक्टोबर 2021 रात्री 11:59 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे आहेत. हे सर्व अर्ज परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा सैल, राज्यात आज  2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
 कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 389  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 86  हजार 059  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे. 
 
राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 839  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (14), नंदूरबार (2),  धुळे (2), जालना (40), परभणी (72), हिंगोली (15), नांदेड (08),  अकोला (22), वाशिम (06), बुलढाणा (23), नागपूर (99), यवतमाळ (09),   वर्धा (8), भंडारा (2), गोंदिया (1),   गडचिरोली (16 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. राज्यात सध्या 33 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,40,088 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,355  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 93,37, 713 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,62, 514(11.06 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Facebook Stock Falls : सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान
फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका या तीनही सोशल मीडिया कंपन्यांना चांगलाच बसलाय. फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. कालच्या या घटनेनंतर फेसबुकचं मोठं नुकसान झालं असून त्याचे शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले आहेत. 

फेसबुकच्या गडगडलेल्या शेअर्समुळे कंपनीला अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या दरम्यान, स्लोडाऊनसाठी नेमकं काय कारण आहे याचा शोध कंपनीच्या वतीनं घेण्यात येत होता. या वर्षीच्या जुलै महिन्यात फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. आता त्याची किंमत घसरली असून ती 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. 

23:08 PM (IST)  •  05 Oct 2021

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आणखी चार जणांना अटक

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आणखी चार जणांना अटक. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे : समीर वानखेडे

22:01 PM (IST)  •  05 Oct 2021

महिलेला गुप्तांग दाखवून विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून सुनावली शिक्षा

महिलेला गुप्तांग दाखवून विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून सुनावली शिक्षा. 18 सप्टेंबर रोजी महर्षी कर्वे रोड येथे महिलेची छेड काढत असल्याचा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीला अटक केली. आरोपी राजकुमार नारायण तांडेलवर याआधीसुद्धा महिलांची छेड काढण्याचे 3 गुन्हे दाखल असून 2 गुन्ह्यात त्याला शिक्षा सुद्धा झाली असल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झालं. राजकुमार तांडेल सराईत गुन्हेगार असून त्याला तात्काळ शिक्षा होन गरजेचं होतं. युध्दपातळीवर तपास करत 28 सप्टेंबरला न्यायालयात आरोपपत्र दाखल करत फक्त 6 दिवसांच्या सुनावनीत आरोपीला 3 वर्षांची सश्रम कारावास आणि 1 हजार रु दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

18:32 PM (IST)  •  05 Oct 2021

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्व मंत्र्यांसोबत मंगळवारी 12 तारखेला मुंबईत बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्व मंत्र्यांसोबत मंगळवारी 12 तारखेला मुंबईत बैठक. बैठकीमध्ये मराठवाडा, विदर्भातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शरद पवार आढावा घेणार असल्याची 'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या मदतीसाठीच्या मोठ्या पॅकेजबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटनाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget