Breaking News LIVE : अकोला जिल्ह्यातील सैनिक निलेश धांडे यांना नागालँड येथे वीरमरण; सोमवारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
Breaking News LIVE Updates, 03 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
NCB Raid : क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर NCBची कारवाई, बड्या अभिनेत्याच्या मुलासह 10 ताब्यात
मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आता एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह दहा लोकांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ टर्मिनलवरुन एक क्रूझ लक्ष्यद्वीपकडे जाणार होती. ज्यात एनसीबी अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती आहे. या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे काही जणांना घेऊन एनसीबी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती आहे.
Coal Shortage: देश अंधारात जाण्याची भिती! 72 पॉवर प्लांटमध्ये फक्त 3 दिवसांचा कोळसा शिल्लक
देशावर वीज संकटाचा धोका निर्माण झाला आहे. खरं तर, देशातील 72 पॉवर प्लांटमध्ये फक्त तीन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. ऊर्जा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वीज मंत्रालयाने म्हटले आहे की, जर कोळसा वेळेवर पुरवला गेला नाही तर देशातील अनेक वीज प्रकल्प बंद पडू शकतात. उर्जा मंत्रालयाच्या मते, जर कोळसा वेळेवर उपलब्ध झाला नाही, तर देशात मोठे वीज संकट येऊ शकते. सरकारी मालकीच्या कोल इंडियाचे कोळसा उत्पादन सप्टेंबरमध्ये किरकोळ वाढून 47 दशलक्ष टन झाले आहे. कोल इंडियाचे उत्पादन अशा वेळी वाढले आहे जेव्हा देशातील औष्णिक वीज केंद्रांना कोळशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली, राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 062 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 77 हजार 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.
राज्यात काल 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 096 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (11), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (36), परभणी (61), हिंगोली (15), नांदेड (11), अकोला (24), वाशिम (08), बुलढाणा (09), यवतमाळ (09), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. राज्यात सध्या 35 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,47,006 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,370 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 90, 74, 660 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,56, 657(11.1 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
अकोला जिल्ह्यातील सैनिक निलेश धांडे यांना नागालँड येथे वीरमरण; सोमवारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
अकोला जिल्ह्यातील सैनिक निलेश धांडे यांना नागालँड येथे वीरमरण; सोमवारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
अकोला जिल्ह्यातील वरुर जऊळका येथील सैनिक निलेश प्रमोद धांडे हे सैन्य दलाच्या 'Border Road Organization' (BRO) मध्ये नागालँड येथे कार्यरत होते. त्यांना कर्तव्यावर असताना वीर मरण आले असल्याची माहिती गावातील सुत्रांनी दिली आहे. उद्या त्यांच्या मूळ गावी 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
माथेरान येथील दरीत आढळला बेपत्ता तरुण पर्यटकाचा मृतदेह
माथेरान येथील दरीत आढळला बेपत्ता तरुण पर्यटकाचा मृतदेह. 26 सप्टेंबर रोजी फिरायला गेलेल्या निशांत याचा मृत्यू, सात दिवसांनी आढळला मृतदेह. लुईझा पॉईंटनजीकच्या दरीत आढळला मृतदेह.
पगार थकवला म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी पेटवली
पगार थकवला म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी पेटवली. पिंपरी चिंचवडच्या भर रस्त्यात ही घटना रविवारी सायंकाळी घडली. चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. अंकित यादव असं कामगाराचे तर गणेश उंडरे पाटील असं मालकाचे नाव आहे. पिंपळे गुरव येथे उंडरे यांची सिमेंट ब्लॉक बनविण्याची कंपनी आहे. तिथं अंकित काम करतो. मालकाने अंकीतला दुचाकी वापरायला दिली होती. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचं चाळीस हजारांचा पगार थकवला. त्याच रागात जाऊन त्याने हे कृत्य केलं.
सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मागील अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस. सांगली शहरातील अनेक रोडवर पाणी
सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मागील अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस. सांगली शहरातील अनेक रोडवर पाणी
नागपूर जिल्ह्यातील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी येथे भीषण अपघात
नागपूर जिल्ह्यातील अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी येथे भीषण अपघात. रस्त्यावर उभ्या असलेल्या चार प्रवाशांना कारने चिरडले. चारही प्रवाशांचा मृत्यू. एकाच कुटुंबातील चार सदस्य. रस्त्यावर उभे राहून हे कुटुंब बसची प्रतीक्षा करत होते.