Breaking News LIVE : संयुक्त किसान मोर्चाकडून योगेंद्र यादव एक महिन्यासाठी निलंबित
Breaking News LIVE Updates, 21 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 25 तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम, उदय सामंतांची घोषणा
Narayan Rane On Cm Uddhav Thackeray : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद, असा प्रहार (Prahaar Newspaper) नारायण राणेंनी केला आहे. हिंमत असेल तर शिंगावर घ्या, असं आव्हानही राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
राणेंच्या प्रहारमधून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका
"मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!' की किती हा बोगसपणा? किती खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्री पद!!", असं नारायण राणे अग्रलेखातून म्हणाले आहेत.
नारायण राणे यांनी अग्रलेखातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, "यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आदर्श आत्मसात करून काम करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवता येत नाही. सध्या संजय राऊत नैराश्यामध्ये आहेत. त्या अवस्थेमधूनच ते उद्धव यांना सर्वांपेक्षा वरचढ दाखवायचे आणि नसलेले गुण त्यांच्या अंगी चिकटवून त्यांना कर्तबगार दाखवायचे, हे एकमेव काम करीत असतात. 'सामना'च्या याच अंकात 'फटकारे' या मथळ्याखाली '…"
संयुक्त किसान मोर्चाकडून योगेंद्र यादव एका महिन्यासाठी निलंबित
संयुक्त किसान मोर्चाकडून योगेंद्र यादव एका महिन्यासाठी निलंबित
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी शोक व्यक्त करण्यासाठी भाजप कार्यकर्ता शुभम मिश्रा यांच्या घरी भेट दिल्यानंतर केली कारवाई. याची मागणी पंजाबच्या शेतकरी संघटनांनी केली होती.
मुंबई गोवा महामार्गावर खेरशेत जवळ व्हेल माश्याची 6 किल्लो 200 ग्रॅमची उलटी पकडली
मुंबई गोवा महामार्गावर खेरशेत जवळ व्हेल माश्याची 6 किल्लो 200 ग्रॅमची उलटी पकडली. वनविभागाची कारवाई. याची बाजारात अंदाजे किंमत 6 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून यात एका महिलेचा समावेश आहे. महाड, रायगड, गुहागर, माणगांव येथील आरोपी. अजूनही वनविभाग आणि पोलिस यांचा संयुक्त तपास सुरु आहे.
टीईटी परिक्षेची तारीख पुन्हा बदलली, आता 21 नोव्हेंबर रोजी होणार टीईटी परीक्षा
टीईटी परिक्षेची तारीख पुन्हा बदलली, आता 21 नोव्हेंबर रोजी होणार टीईटी परीक्षा. राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी होणारी टीईटीची परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी टीईटी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) आयोजित करण्यात आली होती.
मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे.
आता टीईटी ही परीक्षा 30 ऑक्टोबर 2021 ऐवजी 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार असल्याचे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.
सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेतून रोख रक्कम काढण्यावर निर्बंध
सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेने रोख रक्कम काढण्यावर निर्बंध घातलेत. खातेदारांना यापुढे सात दिवसांत फक्त पाच हजार रुपये रक्कम काढता येईल. त्यामुळे खातेधारकांमध्ये संताप आहे. थकीत कर्जाची वसुली नियमित न झाल्याचे कारण देत बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेत रोकड तुटवडा आहे. म्हणून बँकेने केवळ पाच हजार रुपये आठवड्याला काढता येतील असा सूचना खातेदारांना दिल्या आहेत. काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल, असंही बँकेकडून सांगण्यात आलंय. खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कर्जाच्या मोबदल्यात ठेवण्यात येणारे तारण देखील कर्जवाटप क्षमतेच्या दुप्पट एवढे आहे त्यामुळे खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे. मात्र अनेकांच्या एफडी परिपक्व झाल्या आहेत, लग्न, हॉस्पिटल अशा कारणांमुळे पैशाची गरज आहे. मात्र बँकेतर्फे केवळ 5 हजार रुपये काढण्याची मुभा दिली जात आहे, त्यामुळे खातेदार चिंतेत आहेत