Breaking News LIVE Updates : दिवसभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Breaking News LIVE Updates, November 07 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये काल (शनिवारी) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण होरपळले आहेत. दरम्यान, अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. तर याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) विभागाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Ahmednagar collector Rajendra Bhosale) यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला. काल (शनिवारी) सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये (Ahmednagar Fire) अनेक रुग्ण होरपळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ऐन दिवळी घडलेल्या या भयावह घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मात्र इमारत आणि वायरिंगही नवीन असताना इतक्यात शॉर्टसर्किट कसं झालं, इमारतीचं फायर ऑडिट झालं होतं की नाही, अग्नीरोधक यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
Nawab Malik Press Confernce : नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद, काय गौप्यस्फोट करणार? याकडे लक्ष
Nawab Malik Press Confernce : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज (रविवारी) आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. भाजप नेते मोहित कंबोज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित सुनील पाटील यांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता रविवारी सकाळी नवाब मलिक पत्रकार परिषदेत कोणता गौप्यस्फोट करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच या प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसल्या. सध्या या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांमुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अशातच काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे. मोहित कंबोज यांनी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे यासर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती उघड करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनीही मलिक यांच्याविरोधात आरोप सुरू केले. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यावर मलिक यांनी मोहित कंबोज हे समीर वानखेडे यांच्या आर्मीचा सदस्य असून पत्रकार परिषदेत खोटे आरोप केले आहेत. मी या प्रकरणी सत्य सर्वांसमोर आणणार असल्याचे मलिक यांनी कंबोजच्या पत्रकार परिषदेनंतर म्हटले.
कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला; आता देवाचे राजोपचार बंद
Pandharpur News : कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी कालपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. काल (शनिवारी) पहिल्यांदाच संध्याकाळी धुपारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच, देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही 24 तास खुले राहायचे, मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता असल्यानं कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.
नवाब मलिक आज कोणता 'बॉम्ब' फोडणार? याकडे लक्ष
Nawab Malik Press Confernce : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज (रविवारी) आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. भाजप नेते मोहित कंबोज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित सुनील पाटील यांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता रविवारी सकाळी नवाब मलिक पत्रकार परिषदेत कोणता गौप्यस्फोट करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एबीपी माझा लाईव्हवर...
एबीपी माझा लाईव्ह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :