Breaking News LIVE : कोविड 19 वरील उपचारामधून प्लाझ्मा थेरपी काढली जाण्याची शक्यता, अंतिम निर्णय प्रतिक्षेत : सुत्र
Breaking News LIVE Updates, 15 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहून मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या.
खुशखबर! एकदिवस अगोदर मान्सून केरळात दाखल होणार! तॉक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सज्ज
कोरोनामुळे सध्या सगळीकडेच नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये एकदिवस आधी दाखल होणार आहे. 31 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर हजेरी लावणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
तॉक्ते वादळ भारतीय हद्दीतून 21-22 मे ला बाहेर पडल्यानंतर पोषक वातावरण तयार होत असल्याने त्यानंतर आठ दिवसात अरबी समुद्रात मान्सून दाखल होणार आहे. तर 21 मे रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होणार आहे. त्याआधी 20 मे पासून बे ऑफ बंगालमध्ये मान्सूनला पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दिलासा...! राज्यात शुक्रवारी 53,249 रुग्ण बरे होऊन घरी तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4707980 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.68% एवढे झाले आहे.
कोविड 19 वरील उपचारामधून प्लाझ्मा थेरपी काढली जाण्याची शक्यता, अंतिम निर्णय प्रतिक्षेत : सुत्र
कोविड 19 वरील उपचारामधून प्लाझ्मा थेरपी काढली जाण्याची शक्यता, अंतिम निर्णय प्रतिक्षेत : सुत्र
राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची सख्या जास्त
दिलासादायक! राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची सख्या जास्त. आज 59 हजार 073 रुग्णांना डिस्चार्ज तर नवीन 34 हजार 848 लोकांना कोरोनाची बाधा.
उल्हासनगर मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना अपडेट, 17 जणांना बाहेर काढण्यात यश
उल्हासनगर मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना अपडेट, 17 जणांना बाहेर काढण्यात यश. 14 वर्षाच्या मिलिंद पारचा आणि 23 वर्षीय ऐश्वर्या डोटवाल या दोघाचा मृत्यू. आणखी तीनजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता. टीडीआरफ, उल्हासनगर अग्निशमन दलाचे मदतकार्य सुरू.
Mumbai Corona Cases : मुंबईत आज 1447 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2333 रुग्णांना डिस्चार्ज
Mumbai Corona Cases : मुंबईत आज 1447 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2333 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत 6 लाख 34 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आणखी दोन समर्थकांना बेड्या
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आणखी दोन समर्थकांना बेड्या ठोकण्यात आल्यात. हृतिक उर्फ भावड्या वाघमारे आणि आतिष जगताप अशी दोघांची नावं आहेत. कथित गोळीबारातील आरोपी तानाजी पवारला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कंत्राटदार अँथोनीच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. आत्तापर्यंत आमदार अण्णा बनसोडेंच्या चार समर्थकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी आमदार पुत्र आणि पीए पर्यंत मात्र पिंपरी चिंचवड पोलीस पोहचू शकलेली नाही. हा कथित गोळीबार 12 मे च्या दुपारी घडला. त्याच दिवशी गोळीबाराचा आरोप असलेल्या तानाजी पवारला तातडीनं अटक करण्यात आलेली आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय आमदारांच्या मुलाला तातडीनं अटक का झाली नाही, असा प्रश्न आहे.