Breaking News LIVE : Breaking News LIVE : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण उद्या राज्यपालांची भेट घेणार
Breaking News LIVE Updates, 10 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
राज्यात अनेक ठिकाणी 'अवकाळी'चा तडाखा, कुठं शेतीचं मोठं नुकसान तर कुठं जीवितहानी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानं खूप मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी देखील झाली आहे.
बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात आसोला येथील शेतीचे खचून प्रचंड नुकसान झाले. तर जाहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला टेलर व जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेले फळबागांचेही नुकसान झाले.
रविवारी राज्यात 60,226 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यभरात आज 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.4 % एवढे झाले आहे. काल कारण आज 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान
कोरोनावरून सुरु असलेल्या राजकारणावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करु नका, अशा शब्दात गडकरींनी कान टोचले आहेत. नागपूरमध्ये भाजपच्या झालेल्या बैठकीत त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर सदस्य उद्या राज्यपालांची भेट घेणार
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर सदस्य उद्या राज्यपालांची भेट घेणार, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यामुळे हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून मिळू शकते, त्यामुळे राज्यपालांना भेटून निवेदन देणार, संध्याकाळी पाच वाजता होणार भेट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या चौकशी समितीबाबत निर्णय
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या चौकशी समितीबाबत निर्णय, निवृत न्यायाधीश कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांना मिळणार उच्च न्यायलयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे वेतन आणि भत्ते इतके मानधन मिळणार, उच्चस्तरिय चौकशी समितीचे वकील अॅडवोकेट शिशिर हीरे यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी दिवसाचे 15 हजार इतके मानधन मिळणार, भैया साहेब बोहरे ( समितीचे प्रबंधक) , सुभाष शिखरे ( समितीचे शिरस्तेदार) हर्षवर्षंन जोशी (समितीचे लघुलेखक ) संजय कार्णिक ( कार्यालयीन अधीक्षक दंडाधिकारी )
बदलापूर शहरात लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा लॉकडाऊन अखेर रद्द, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले नवीन आदेश
बदलापूर शहरात लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा लॉकडाऊन अखेर रद्द, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले नवीन आदेश, आता पूर्वीप्रमाणे सकाळी 7 ते 11 सगळी दुकानं सुरू राहणार, तर त्यानंतर अत्यावश्यक दुकानं सुरू राहणार, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती, त्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊन मागे घेतला
लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता
लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती, अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती जैसे थे, 31 मेपर्यंत हेच निर्बंध कायम राहण्याची शक्यता, अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर वाढताना दिसतोय, त्यामुळं लॉकडाऊन कायम राहणार
आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी
मोठा दिलासा...! आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान