Breaking News LIVE : शहापुरात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर तीन जखमी
Breaking News LIVE Updates, 06 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
CM Uddhav Thackeray : रुग्णवाढ मंदावतेय पण गाफील राहू नका, महाराष्ट्र अजूनही धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री ठाकरे
राज्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे. हे सगळं असलं तरी गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांच सुप्रीम कोर्टानं कौतुक केलंय. हे आपल सर्वांच यश आहे. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद.... आपण सर्वांनी संयमाने, जिद्दीने शासनाला आणि महापालिकेला मदत करत आहात, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील रुग्णवाढ मंदावत आहे. तरीही गाफील राहु नका, महाराष्ट्र अजुनही धोक्याच्या वळणावर! जे जे करण्याची गरज आहे ते ते करण्याचा प्रयत्न सुरु.
आपण निर्बंध लादुन किंवा पाळून म्हणा, एक सुरुवात केली दुसर्या लाटेशी युद्धाची. अन्य राज्ये देखील आता लॉकडाऊन करत आहेत. तिसर्या लाटेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील इशारा दिला आहे. 25 एप्रिलला राज्यात जवळपास सात लाखाला पोहचलो होतो आणि 4 मे म्हणजे काल 641000 इतकी आपण रुग्णवाढ थोपवली आहे. काही जिल्ह्यात मात्र रुग्णवाढ होत आहे, आपण लक्ष ठेवून आहोत, असं ते म्हणाले.
CM Thackeray On Maratha Reservation : तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री
मराठा समाजाने जो संयम आणि शांतता आजवर दाखवली तीच पुढेही दाखवावी, सरकारवर विश्वास ठेवावा, ही लढाई सरकार जिंकून दाखवेल, तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. मराठा नेत्यांनी, समाजाने शांतपणे हा निर्णय ऐकला, त्याबद्दल त्यांचे हात जोडून धन्यवाद असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा विशेष उल्लेख केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी जास्त वेळ न घालवता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, आता या माध्यमातून मी विनंती करत आहे, उद्या पत्र देखील लिहिणार आहे. जर गरज असेल तर आम्ही तिथे येऊन चर्चा करण्याची तयारी आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडुन प्राप्त निकालाच्या प्रतीचा अभ्यास विधी तज्ञांची समिती हा छोटा शब्द ठरेल, फौज त्याचा अभ्यास करत आहे. आरक्षणाचा अधिकार केंद्र आणि राष्ट्रपतींचा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. कलम 370 हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत दाखवा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
शहापुरात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर तीन जखमी
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन,
8 मे रात्री आठपासून 15 मे सकाळी सात वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन,
हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्व सेवा राहणार बंद,
सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असलेले किराणा दुकान इतर अत्यावश्यक सेवेवर देखील निर्बंध,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश,
आज 63842 रुग्ण बरे होऊन घरी
आज 63842 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात 62194 नवीन रुग्णांचे निदान, राज्यात आज 853 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युंची नोंद
दिल्लीहून चालणाऱ्या 28 ट्रेन्स पुढील आदेशापर्यंत रद्द
दिल्लीहून चालणाऱ्या 28 ट्रेन्स पुढील आदेशापर्यंत रद्द, यामध्ये शताब्दी, दूरंतो, राजधानी एक्स्प्रेस अशा महत्वाच्या गाड्यांचा समावेश, कोरोना काळात प्रवाशी संख्या कमी झाल्यानं रेल्वे प्रशासनाचा निर्णय
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, सनातन संस्थेचा सदस्य असलेल्या विक्रम भावेला सीबीआयने साल 2013 मध्ये केली होती अटक, सीबीआयने जामीनावर मागितलेली स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, एक लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश, मात्र पुणे एनआयए कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई, निर्धारित केलेल्या वेळेत नियमितपणे तपास यंत्रणेपुढे हजेरी तसेच कोर्टातील सुनावणीस उपस्थित राहणं बंधनकारक