Breaking News LIVE : मुंबईहून कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅंकर झाला लीक
Breaking News LIVE Updates, 05 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार
मराठा आरक्षणाबाबतचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी 10.30 वाजता निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. 1992 मधील इंदिरा साहनी खटल्याप्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे की नाही आणि इंदिरा साहनी खटल्याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज आहे की नाही, याचं परीक्षण करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.
राज्यात मंगळवारी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांचा आकडा जास्त
राज्यात लॉकडाऊन लावल्याचा थोडाफार परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 60 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात मंगळवारी 51 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे काल राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.16% एवढे झाले आहे. राज्यात काल 891 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटलांची बाजी, तीन दशकांनंतर सत्तांतर
कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ज्या गोकुळ दूध संघाच्या अवतीभवती फिरत त्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गोकुळमध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झालं आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारली आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीला 21 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता आता संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे साधारण दीड वर्ष रखडलेल्या गोकुळच्या या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान पार पडलं. एकूण 3 हजार 547 मतदार असलेल्या या गोकुळ दूध संघात कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर 99.78 टक्के इतकं मतदान पार पडलं होतं.
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाला शासन मान्यता
सातारा : कर्मवीर डाॅ. भाऊराव पाटील यांच्या नावाने समूह विद्यापीठ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात या विद्यापीठात साता-यातील तीन महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. रयत शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. राज्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. संस्थेचे राज्यस्तरीय समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले, समूह विद्यापीठासाठी लागणारा निधी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत 33 कोटी रुपये केंद्र शासन आणि 22 कोटी रुपये राज्य शासन असा एकूण 55 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल.
रयत शिक्षण संस्थेत पारंपरिक शिक्षणाबरोबरच 30 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. यासाठी पदभरती करणे आवश्यक आहे. या पदभरती प्रक्रियेला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांकडे पुरेशा शैक्षणिक, भौतिक व तांत्रिक पायाभूत सोयीसुविधा आहेत अशा 3 ते 5 विद्यमान महाविद्यालयांची संसाधने एकत्रित करुन, ही विद्यापीठे निर्माण करण्याकरिता तसेच विद्यापीठाचे विविध दर्जात्मक मापदंड मोठ्या प्रमाणात दर्शवून गुणवत्तेचा दर्जा राखण्यात समर्थ असलेल्या महाविद्यालयांचा समावेश करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या मान्यतेच्या वृत्ताबाबत संस्थेचे चेअरमन व कर्मवीरांचे पणतू डाॅ. अनिल पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले, "पारंपरिक विद्यापीठांपेक्षा या विद्यापीठाचा अभ्यासक्रम वेगळा असेल. येथे अॅकॅडमीक पेक्षा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य असेल. विद्यार्थ्याला कोणतं कौशल्य आत्मसात करायचं आहे, त्यादृष्टीने अभ्यासक्रम ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला या ठिकाणी असणार आहे."
पहिल्या टप्प्यात साता-यातील छत्रपती शिवाजी काॅलेज, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय आणि धनंजयराव गाडगील वाणिज्य महाविद्यालय या तीन स्वायत्त महाविद्यालयांचे मिळून हे विद्यापीठ असेल. या तिन्ही महाविद्यालयांना 'नॅक'चा सर्वोत्कृष्टतेचा A+ हा दर्जा आहे.
बीडमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा
कोरोनाच्या महामारीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बीड शहरात आंदोलन करणारे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व अन्य 10पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यावर शिवाजी नगर पोलिसात जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे
विनायक मेटे यांनी उभारलेल्या कोईड सेंटरचे उदघाटन करण्यासाठी बीडमध्ये विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज सकाळी बीड मधील भाजपा कार्यालया समोर पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तेथील सरकारचा निषेध केला या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमवून जिल्हात लागू असलेल्या जमाव बंदीचे उल्लंघन केले म्हणून शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रेमडीसीविर वाटपावरून काही मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
- आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रेमडेसिविर वाटपावरून काही मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी,
- रेमडेसिविरचं जिल्हा निहाय होणारं वाटप योग्य प्रमाणात होत नसल्याचा काही मंत्र्यांचा आक्षेप,
- वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यात जास्त रेमडेसेवीर देत असल्याचा आक्षेप,
- एकीकडे केंद्र सरकार मंजूर केलेल्या प्रमाणात रेमडेसिविर देत नाही,
- दुसरीकडे जो काही स्टॉक मिळतो त्याचे जिल्हानिहाय योग्य वाटप झाले पाहिजे अशी मागणी काही मंत्र्यांनी केली,
- केंद्राकडून 9 मे पर्यंत राज्याला अजून तीन लाख 20 हजार रेमडेसिविर मिळणे बाकी आहे,
मागणी जास्त पुरवठा कमी असल्याने मंत्र्यांमध्ये केंद्र सरकारबाबतही नाराजी,
मुंबईहून कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅंकर झाला लीक
Breaking News LIVE : मुंबईहून कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅंकर झाला लीक, पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हद्दीतील घटना, सातारा पोलीस घटनास्थळी दाखल, ओव्हरलोडमुळे लीकेज, पोलिसांची माहिती
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात कार 100 फूट खोल दरीत कोसळली
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात कारचा अपघात, सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली कार, मुंबई-पुणे हायवेवरील बॅटरी हिलनजीक दरीत कोसळली कार, कारचालक मंगल चौहान गंभीर जखमी, एमजीएम रुग्णालयात दाखल, पत्नी आणि दोन मुले किरकोळ जखमी...