(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू
Breaking News LIVE Updates, 9 March 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त
राज्यात आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात सलग तीन दिवस दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 8744 एवढी आहे. तर आज 9068 जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झालं आहे. दरम्यान मागील 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 52 हजार 500 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत जात असल्याने हॉट स्पॉट क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे परिपत्रक ठाणे महापालिकेने काढले आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मोहीम सुरू करण्यात आली असून दुसरीकडे रुग्ण वाढीमुळे लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असले तरी,रूग्णसंख्या वाढतीच राहीली आहे.त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा 16 झाली आहे.तेव्हा,कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये 31 मार्चपर्यत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
कोलकाताच्या स्ट्रैंड रोड परिसरातील इमारतीला भीषण आग, 9 जणांचा मृत्यू
कोलकाताच्या स्ट्रैंड रोड परिसरातील एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या इमारतीत रेल्वेच कार्यालय देखील असल्याचं कळतय. 10 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू
जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.
उल्हासनगरमध्ये विशेष समित्यांवर भाजपचे वर्चस्व
उल्हासनगर महापालिकेत एकूण ९ विशेष समित्यांची आज ऑनलाइन निवडणूक पार पडली, या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम समिती डिम्पल ठाकूर,नियोजन व विकास समिती दीपा पंजाबी,पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती अजित गुप्ता,आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती शंकर लुंड,आणि महिला बाल कल्याण समितीवर ज्योती पाटील हे भाजपचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
उल्हासनगरमध्ये विशेष समित्यांवर भाजपचे वर्चस्व, सत्ताधारी शिवसेनेला चारली धूळ
उल्हासनगर महापालिकेत भाजपने सत्ताधारी शिवसेनाला धूळ चारली आहे. इथे आज पार पडलेल्या विशेष समित्यांच्या निवडणुकीत भाजपने 9 पैकी 8 जागांवर आपले वर्चस्व निर्माण केले. उल्हासनगर महापालिकेत एकूण 9 विशेष समित्यांची आज ऑनलाइन निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम समिती डिंपल ठाकूर, नियोजन व विकास समिती दीपा पंजाबी, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती अजित गुप्ता, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती शंकर लुंड आणि महिला बाल कल्याण समितीवर ज्योती पाटील हे भाजपचे सर्व उमेदवार बीन विरोध निवडून आले. महत्वाचे म्हणजे क्रीडा समाज कल्याण या समितीत शिवसेनेच्या उमेदवाराने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या समितीवर देखील भाजप उमेदवार गीता साधनानी बिनविरोध विजय झाले. तर पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षण समिती वर शिवसेनेच्या शुभांगी बेहनवाल यांची फक्त निवड झाली, पालिका सभागृहात पार पडलेल्या या ऑनलाइन निवडणुकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणुन काम पाहिले.
पुण्यात कापला कोरोना केक
राज्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झालं. वर्षभरानंतरही राज्यात कोरोना उद्रेक कमी झालेला नाही. त्यामुळे मनसेने पुण्यात उपहासात्मकपणे कोरोना केक कापून गो कोरोना गो अशी घोषणाबाजी केली.मनसेच्या नेत्या रुपाली पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा केक कापत सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सरकारची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केलाय. पुणेकरांवर पुन्हा लॉकडाऊन लादण्या ऐवजी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी यावेळी केली.
कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह भासवण्याचा प्रकार, मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा
विमान प्रवासासाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये फेरफार करुन रिपोर्ट निगेटिव्ह भासवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघड झाला आहे. खारमधील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींवर खार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल