Breaking News LIVE : गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाचं मोठं यश, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त
Breaking News LIVE Updates, 5 March 2021:दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
शहरातील जुन्या वास्तूंचा खासगीकरणातून विकास करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय
केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत पुणे महापालिकेनेही खासगी गुंतवणूकीची दारं उघडली आहेत. त्यातही पुणेकरांच्या आपुलकीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंचा पुनर्विकास खासगी सहभागातून केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पुण्याची ओळख असलेली ही ठिकाणी आता खासगी विकसकांच्या हवाली केली जाणार असल्याने या स्थळांचे जतन होणार की खासगीकरण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी आयटी छाप्यानंतर कंगना रनौतचे ट्विट
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. अशा परिस्थितीत कंगना रनौतने आपली प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहे. आज कंगनाने ट्विट करुन दोघांवरील आपला राग व्यक्त केला आहे. कर चुकवण्याबरोबरच काळ्या पैशाच्या व्यवहाराचेही गंभीर आरोप तिने केले. मात्र, तिने कोणाचेही नाव घेतले नाही.
"दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला
"काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत उत्तर देत होते. "मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी "मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय", असं उत्तर राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलं होतं. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानपरिषदेत राज ठाकरे यांना टोला लगावला.
OPEC चा कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढवण्याचा निर्णय, इंधनाच्या किंमती वाढणार?
जगातल्या तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या ज्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येतंय तेवढाच उत्पादनाचा स्तर राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमती लवकरच कमी होतील हा आशाही धुसर झाली आहे. सौदी अरबच्या नेतृत्वाखाली ओपेक देशांची गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये ओपेकचा सदस्य नसलेला पण प्रमुख तेल उत्पादक असलेला देश रशियाही सामिल झाला होता. जगाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे मंदीच्या खाईत गेली असताना या पार्श्वभूमीवर ओपेकने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या अनेक देशांना याचा फटका बसणार असून त्या देशांची अर्थव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.