Breaking News LIVE : Maharashtra लातूर शहरासह निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसामध्ये आजपासून पुढील आदेशापर्यंत रात्रीची संचारबंदी लागू
Breaking News LIVE Updates, 3 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा गाडी मुंबईतच? पोलिसांकडून कसून तपास
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियापासून हाकेच्या अंतरावर चार दिवसांपूर्वी स्फोटक असलेली गाडी ठेवण्यात आली होती. मात्र यामागे कोण आहे? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षा रक्षकांचे जबाबही याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी 700 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. 10 पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत.
आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी
गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाची असणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आहे. ही 2021 या नव्या वर्षातील पहिली संकष्टी. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना आहे. या दिवशी मंदिरांमध्ये गर्दी असते मात्र आज कोरोनामुळं ही गर्दी तुलनेनं कमी पाहायला मिळणार आहे.
राज्य सरकारचा सर्वाधिक निधी कर्जफेडीसाठी, पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 16,200 कोटींची तरतूद
राज्य सरकारचा सगळ्यात जास्त निधी हा कर्जफेडीसाठी जात असल्याचे चित्र आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागणी मांडल्या. त्यात कर्जफेडीसाठी मोठ्या रकमेची तरतुद केल्याचे चित्र आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केलेल्या 21 हजार 076 कोटींच्या पुरवणी मागण्यात कर्जफेडीसाठी तब्बल 16 हजार 200 कोटींची तरतुद केली आहे.
इयत्ता 10 वीची परीक्षा 5 मे तर 12 वीची परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होणार
काउंसिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) परीक्षा 2021 च्या तारखांची घोषणा केली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 5 मे पासून आणि इयत्ता 12 वीची परीक्षा 12 एप्रिलपासून सुरू होईल.