Breaking News LIVE : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांचे बंडाचे निशाण, दाखल केली उमेदवारी
Breaking News LIVE Updates, 26 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
पुण्यातील कॅम्पमध्ये फॅशन स्ट्रीट परिसरात आग
पुण्यातील कॅम्प मधे फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागली आहे. आग खूप मोठी आहे. अग्निशामक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही पाण्याचे टॅंकर देखील पोहोचत आहे
पाण्यासाठी संतप्त महिलांनी हतेडी ग्रामपंचायतला ठोकले कुलुप
बुलडाणा तालुक्यातील ग्राम हतेडी या गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असुन एक-एक महीना नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. आज संतप्त शेकडो महिलांनी हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयवर रिकामे हंडे घेऊन मोर्च्या काढला व ग्रामपंचायतिच्या नियोजनशून्य कारभारा विरोधात संताप व्यक्त केला या संतप्त महिलानी ग्रामपंचायत कार्यालयला कुलुप ठोकले.मागील काही महिन्यापासुन हतेडी गावात पाणीटंचाई आहे. या गावामध्ये पाणी पुरवठासाठी जलस्वराज्य योजना व इतर काही उपाययोजना करण्यात आले होत्या परंतु अशा योजनेवर लाखो-करोडो रुपये खर्च करुण ही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेले आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनकडून कडक निर्बंध
लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासन आता कडक अंमलबजावणी करतेय. आज लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. उद्यापासून चार एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील. लातूर जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्याही तीनशेच्या पुढे रोज येत आहे. यामुळे भविष्यातील धोका ओळखून आता उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, पान सेंटर, मंगल कार्यालय, सभागृह बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल, बियर बार या ठिकाणी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑटो रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी असणार आहे. बसमध्ये नो मास नो एन्ट्री याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सीटिंग अरेंजमेंटही व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांचे बंडाचे निशाण, दाखल केली उमेदवारी
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचे निशाण फडकावीत आज बैलगाडीतून वाजत गाजत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शैला गोडसे हे गेल्या निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारल्याने यंदा त्यांनी बंडाचा झेंडा फडकावीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाड्यावस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून आपण काम करीत असून गेल्यावेळी उमेदवारी डावलल्यावरही आपण पक्षादेश मनाला होता. यंदा देखील शिवसेना पक्ष प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष या दोघांचीही भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.
लातूर जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून कडक निर्बंध
आज लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. उद्या पासून चार एप्रिल पर्यंत हे निर्बंध लागू असतील. लातूर जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त एक्टिव रुग्ण आहेत मागील काही दिवसात करोना रुग्णांची संख्याही तीनशेच्या पुढे तो रोज येते यामुळे भविष्यातील धोका ओळखून आता उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, चित्रपटगृह, स्विमिंग पूल,पान सेंटर ,मंगल कार्यालय, सभागृह बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल, बियर बार या ठिकाणी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑटो रिक्षा मध्ये चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी असणार आहे. बस मध्ये नो मास नो एन्ट्री याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सीटिंग अरेंजमेंट ही व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.