Breaking News LIVE : आज राज्यात 14,433 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी, 12,557 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
Breaking News LIVE Updates, 6 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्बंधांबाबत ठरवणार : राज्य सरकार
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरता असताना राज्य सरकारने आता ब्रेक दि चेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रियी सुरु केली आहे. मात्र, आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी असल्याचे सांगण्यात येतंय. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे. कुणीही गोंधळू नये व इतरांना गोंधळवू नये असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नसल्याने वेगवेगळ्या 5 पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत. या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैनदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येणार आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहेत.
BMC Unlock Guideline : मुंबई महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी, लोकल सर्वसामान्यासाठी बंदच
मुंबई : मुंबई महापालिकेने अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईनद्वारे मुबंई लेवल तीनमध्ये आहेत. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट 5.30 टक्के आहे. मात्र पुढच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यासाठी इतर महापालिकांसोबत चर्चा करुन मुंबई महापालिका नवी नियमावलीही जारी करण्याची शक्यता आहे.
मुंबई लोकल सुरु होणार की नाही याची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. सध्या तरी लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. आधीच्या गाईडलाईनप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेकरिताच लोकल प्रवासास परवानगी असणार आहे.
पुणे : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहे. तर सलून, ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने पुन्हा उघडणार आहे. या सुधारित नियमांची अंमलबजावणी सोमवार( 7 जून) पासून करण्यात येणार आहे.
गली : आटपाडी तालुक्यातील घानंद गावामध्ये साखळी बंधाऱ्यातून तीन मुलं वाहून गेली
Breaking News LIVE : सांगली : आटपाडी तालुक्यातील घानंद गावामध्ये साखळी बंधाऱ्यातून तीन मुलं वाहून गेली, एकाच घरातील 15 ते 18 वयोगटातील मुलं, स्थानिकांच्या मदतीने तपासकार्य सुरू
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-june-6-2021-maharashtra-political-news-coronavirus-lockdown-news-989581
आज राज्यात 14,433 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी, 12,557 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 233 जणांचा मृत्यू
आज राज्यात 14,433 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी, 12,557 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 233 जणांचा मृत्यू
मान्सून आज पुण्यात दाखल होणार; भारतीय हवामान विभागाची माहिती
मान्सून आज 6 जूनला पुण्यात दाखल होणार, राज्यात मान्सून अलीबाग- रायगड, पुणे आणि मराठवाडा मधील काही भागापर्यंत पोहोचला. भारतीय हवामान विभागाची माहिती
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
प्रकृती खालावल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल
मराठा समाजावर अन्याय होत आहे - खासदार संभाजीराजे छत्रपती
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून मांडली. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचं म्हणत कोण चूक कोण बरोबर याच्याशी आम्हाला घेणंदेणं नसून आता मराठा समाजाचा आरक्षण द्या अशीच मागणी त्यांनी उचलून धरली