Pune Unlock Guideline पुणे महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी; दुकाने, हॉटेल चार वाजेपर्यंत खुली तर सलून, उद्याने, जीम उघडणार
पुणे जिल्हा प्रशासनाने राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार शहरातील सलून, ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने पुन्हा उघडणार आहे.
![Pune Unlock Guideline पुणे महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी; दुकाने, हॉटेल चार वाजेपर्यंत खुली तर सलून, उद्याने, जीम उघडणार Maharashtra Guideline pune municipal corporation unlock rules Shops and hotels will be open till 4 pm Pune Unlock Guideline पुणे महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी; दुकाने, हॉटेल चार वाजेपर्यंत खुली तर सलून, उद्याने, जीम उघडणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/05/91935b86e4d68058f95b4d852de694c0_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहे. तर सलून, ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने पुन्हा उघडणार आहे. या सुधारित नियमांची अंमलबजावणी सोमवार( 7 जून) पासून करण्यात येणार आहे.
पुण्यात काय सुरू राहणार?
- सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू
- शनिवारी आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार
- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुली राह तील. दुपारी 4 नंतर पार्सल सेवा सुरू
- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक रोज सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू
- खासगी आणि सरकारी कार्यालये (50 टक्के उपस्थिती) संध्याकाळी चारपर्यंत सुरू
- आऊटडोअर खेळ, रनिंग सकाळी पाच ते नऊ
- सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार परवानगी
- लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर शासकीय बैठका क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती
- वास्तव्यास मजूर असलेल्या ठिकाणी बांधकामाला दुपारी चारपर्यंत मंजुरी
- ई कॉमर्स, साहित्य सेवा पुरवठा नियमितपणे सुरू
- जिम, सलून, ब्यूटी पार्लर, वेलनेस स्पा 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी चारपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा, एसीची परवानगी नाही.
- उत्पादन ठिकाणे नियमितपणे सुरू
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पी एम पी एम एल बस पन्नास टक्के क्षमतेने सुरू
- दारुची दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू
- खाजगी वाहनातून आंतरजिल्हा प्रवास करता येणार
पुण्यात काय बंद राहणार?
- शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर दुकानं बंद
- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
- इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.
- सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम शनिवार, रविवार बंद
- संध्याकाळी पाचपर्यंत जमावबंदी. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी
- दारुची दुकानं शनिवारी आणि रविवारी बंद. फक्त होम डिलीव्हरी
संबंधित बातम्या :
Coronavirus New Guidelines : खुशखबर ! आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)