Breaking News LIVE : सीबीएसई बारावी परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यांकनाची नवी पद्धत दोन आठवड्यात स्पष्ट करा : सुप्रीम कोर्ट
Breaking News LIVE Updates, 3 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Corona Cases : राज्यात काल तर 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 29,270 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 285 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात आज एकूण 2,16,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 285 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 674296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.
Mehul Choksi Petition : मेहुल चोक्सीची याचिका रद्द करण्याची डोमिनिका सरकारची कोर्टाकडे मागणी
Mehul Choksi : 14 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सी वास्तव्याला होता. याच बेटावरील डोमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या मेहुल चोक्सी हा भारतातील प्रत्यार्पण रोखण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान डोमनिका सरकारने चोक्सीची याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे.
डोमनिका सरकारने याचिका रद्द करण्याची मागणी करत मेहुल चोक्सी याला भारताला थेट भारतात परत पाठवण्याची विनंती देखील कोर्टाकडे केली आहे. डोमनिका सरकारने पुढे म्हटले की, चोक्सीने दाखल केलेली याचिका सुनवणी योग्य देखील नाही. या प्रकरणी बंद न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायाधिशांनी सर्व पत्रकारांना आपले फोन बंद ठेवण्यास सांगितले.
बदलापूर एमआयडीसी परीसरात केमिकल वायू गळती
बदलापूर एमआयडीसी परीसरात केमिकल वायू गळती, आपटेवाडी, शिरगाव परिसरातील नागरिकांना खोकला, श्वास घेण्यास त्रास
सोलापूर महानगरपालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता
सोलापूर महानगरपालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता,
त्यामुळे सोलापूर शहरसाठी दिलासा मिळण्याची शक्यता,
शहराचत काही प्रमाणात व्यापार-उद्योग निर्बंध होणार शिथिल,
काही वेळात पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश येतील,
2011 ची जनगणना ही 10 लाख पेक्षा कमी असल्याने स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते पालिकेला,
त्यामुळे शहराची कोव्हिडं परिस्थिती आटोक्यात असताना देखील ग्रामीणचेच आदेश शहरात देखील होते लागू,
अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता, अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
म्युकरमायकोसीसचे उपचार केलेले, बरे झालेले आणि मरण पावलेले रुग्ण किती? जिल्हावार माहिती देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
2 ते 9 जून दरम्यान म्युकरमायकोसीसचे उपचार केलेले,बरे झालेले आणि मरण पावलेले रुग्ण किती? किती इंजेक्शनचा दररोज पुरवठा झाला? जिल्हावार माहिती देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश, खंडपीठा अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांना आदेश
सीबीएसई बारावी परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यांकनाची नवी पद्धत दोन आठवड्यात स्पष्ट करा
सीबीएसई बारावी परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यांकनाची नवी पद्धत दोन आठवड्यात स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे आजच्या सुनावणीत केंद्राला आदेश, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर होऊन दोन दिवस झाल्यानंतरही मूल्यांकनाबाबत अजून स्पष्टता नाही त्या पार्श्वभूमीवर आदेश, 15 जूनला या प्रकरणात पुढची सुनावणी, परीक्षा रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर ही खंडपीठाने व्यक्त केले समाधान