Mehul Choksi Petition : मेहुल चोक्सीची याचिका रद्द करण्याची डोमिनिका सरकारची कोर्टाकडे मागणी
मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी देशातील टीम डोमिनिकाला गेली आहे. या टीममधील दोन सीबीआय अधिकारी आहे.
Mehul Choksi : 14 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सी वास्तव्याला होता. याच बेटावरील डोमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या मेहुल चोक्सी हा भारतातील प्रत्यार्पण रोखण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान डोमनिका सरकारने चोक्सीची याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे.
डोमनिका सरकारने याचिका रद्द करण्याची मागणी करत मेहुल चोक्सी याला भारताला थेट भारतात परत पाठवण्याची विनंती देखील कोर्टाकडे केली आहे. डोमनिका सरकारने पुढे म्हटले की, चोक्सीने दाखल केलेली याचिका सुनवणी योग्य देखील नाही. या प्रकरणी बंद न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायाधिशांनी सर्व पत्रकारांना आपले फोन बंद ठेवण्यास सांगितले.
दरम्यान चोक्सीला भारतात आणण्यासाठी देशातील टीम डोमिनिकाला गेली आहे. या टीममधील दोन सीबीआय अधिकारी आहे. मेहुल चोक्सीच्या पत्नीने एका मुलाखतीमध्ये, पत्नी प्रिती चोक्सीने पतीच्या जिवाला धोका असल्याचा भीती व्यक्त केलीय.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वीच मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा येथून फरार झाला होता. त्यानंतर इंटरपोलने त्याच्या विरोधात ‘यलो नोटीस’ जारी केली होती. या नोटीसनंतर डोमिनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. बुधवारी मेहुलच्या अटकेच्या बातमीनंतर अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी म्हणाले की, मेहुल चोकसीला अँटिगाकडे न सोपवण्यास सांगितले आहे. मेहुलला भारतात पाठवण्याची गरज आहे. त्यामुळे त्याला भारताकडे देण्यास डोमिनिका सरकारला सांगितले आहे.
2018 साली जागतिक पोलीस संस्था इंटरपोलने जारी केलेल्या चोकसीविरोधात रेड नोटिसमुळे जगातील कोठेही इमिग्रेशन पॉईंटमध्ये चोकसीने प्रवेश केल्यास त्यांना सतर्क केले जाईल. तसेच भारतीय एजेन्सींना संशय आहे की चोकसी क्युबा इथे आहे. कारण अँटिगाप्रमाणेच क्युबाचाही भारताशी प्रत्यर्पण करार नाही. मेहुल चोकसी हा भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढत आहे. त्याच्याकडे सध्या अँटिग्वानचे नागरिकत्व आहे. गेल्यावर्षी अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन म्हणाले होते की चोकसीचे सर्व कायदेशीर पर्याय संपले की त्याचं नागरिकत्व रद्द केले जाईल.
संबंधित बातम्या :
भारतात आणल्यानंतर मेहुल चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील बॅरेक नंबर 12 च्या सेलमध्ये ठेवणार!
Mehul Choksi : कडेकोट सुरक्षाव्यवस्था, केवळ वकीलांच्या भेटीची परवनागी; अटी-शर्तींसह मेहुल चोक्सीची डोमेनिकातील रुग्णालयात रवानगी