(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकित तोडगा निघाला
Breaking News LIVE Updates, 23rd June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
काल (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरलेल्या आणि कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु करता येतील का? याबाबत तपासणी करण्याची परवानगी शिक्षण विभागाला मुख्यमंत्री यांनी दिली आहे. शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या आणि भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात दहावी बारावीचे वर्ग सुरु करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या विषयावर महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, यांच्यासह शिक्षण विभागातील काही अधिकारी उपस्थित होते. एकीकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरु असताना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येऊन शिकता येईल आणि त्यांचा अभ्यासक्रम योग्य पद्धतीने पुढे सुरु राहील आणि त्याप्रमाणेच शिकवता येईल, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होतील. अशाप्रकरचे नियोजन शिक्षण विभागामार्फत केले जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव सोडून इतर कुठेही अद्याप शाळा सुरु करण्याबाबत कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. पुढील कोरोना परीस्थिती पाहून शाळांबाबत विचार केला जाईल. शिवाय, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोरोना परिस्थितीचा सुद्धा वेळोवेळी आढावा घेऊनच शाळांबाबत महत्वाचे निर्णय घेतला जाईल.
दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णवाढ दुपटीचा वेग 722 दिवसांवर
मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 570 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज 742 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे आज 10 रुग्णांचा मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईतील कोरोनाचं प्रमाण काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मुंबईत एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आल्याचं दिसून येत आहे. आज दिवसभरात 32 हजार 307 कोरोना चाणण्या करण्यात आल्यानंतर 742 जण संक्रमित आढळले आहेत. सध्या शहरात 14 हजार 453 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेट आता 95 टक्के इतका झाला आहे. 15 जून ते 21 दरम्यान कोरोनाचा ग्रोथ रेट हा 0.09 टक्के इतका आहे. दिलासादायक म्हणजे कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 कंटेनमेंट झोन आहेत.
नागपूर : प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला
नागपूर : प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला, नागपूर विभागाच्या त्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त आहेत. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.
नागपूर : प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला
नागपूर : प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला, नागपूर विभागाच्या त्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त आहेत. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.
ओबीसी आरक्षण संदर्भात भूमिका मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्याचा खासदार रक्षा खडसे यांचा आरोप
नंदुरबार: जो पर्यंत ओबीसी आरक्षण संदर्भात निर्णय होत नाही तो पर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. ओबीसी आरक्षण संदर्भात भूमिका मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्याचा खासदार रक्षा खडसे यांचा आरोप.
चंद्रपूर : कोरपना-आदिलाबाद मार्गावरील पारडी येथे भीषण अपघात. अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू
चंद्रपूर : कोरपना-आदिलाबाद मार्गावरील पारडी येथे भीषण अपघात. अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी, 2 बाईकवर होते हे 4 तरूण, अपघात नेमका कसा झाला आणि मृतकांची ओळख पटवण्याचे काम सुरू, मृतक हे तेलंगाणातील इंदरवेली परिसरात राहणारे असल्याची प्राथमिक माहिती
शिर्डी साई विश्वस्त मंडळ पुन्हा लांबणीवर, राज्य सरकारने दोन आठवड्यांची मागितली मुदत
शिर्डी : शिर्डी साई विश्वस्त मंडळ पुन्हा लांबणीवर, राज्य सरकारने दोन आठवड्यांची मागितली मुदत, दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ जाहीर करू, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही, औरंगाबाद हायकोर्टाने मुदत दिली वाढवून, अध्यक्ष उपाध्यक्षासह सदस्य कोण होणार याची पुन्हा उत्कंठा, शिवसेना-राष्ट्रवादी आणी काँग्रेसमध्ये वाटपावरुन मतभेद? याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांची माहिती