Breaking News LIVE : पावसाळी अधिवेशन 7 जुलै रोजी घेण्याचा निर्णय, कोरोनामुळे 2 ते 3 दिवसाचे अधिवेशन होण्याची शक्यता
Breaking News LIVE Updates, 2 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
सीबीएसई पाठोपाठ आता आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल कसा लावणार याबाबत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बेठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभमीवर राज्य सरकार दहावीची परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असताना परीक्षा घेण्याचा याचिकाकर्त्यांचा हट्ट का? राज्यात कोरोनाचा धोका असताना आम्ही आमच्या विशेष अधिकारात ही परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी उपस्थित केला. राज्य सरकारनं नुकताच या परीक्षा रद्द करण्याचा नव्यानं अध्यादेश जारी केल्यानं या याचिकेत दुरूस्ती करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाकडे मागितली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही परवानगी देताना परिक्षा का घेतली जावी? याबाबत याचिकेत सविस्तर मुद्दे उपस्थित करण्याचे निर्देष देत सुनावणी गुरूवार 3 जूनपर्यंत तहकूब केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीच्या परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना थेट दहावी पास प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेत अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशावर आक्षेप घेत पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांच्यावतीने अॅड. उदय वारूंजीकर यांनी याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णायवर ठाम असल्याचं सांगत त्यासंदर्भात अतिरिक्त प्रतिज्ञापात्र कोर्टापुढे सादर केल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली.
तसेच राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरीही धोका अद्याप शमलेला नाही तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात राज्यातून एसएससी (14 लाख), सीबीएसई (22 लाख), आयसीएसई (10 लाख) आणि इंटरनॅशनल बोर्डचे (2 हजार) विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. ही संख्या लक्षात घेता परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांसह पालक, शाळा, प्रशासन यासर्वांरच अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोरोना काळात ह परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं महाधिवक्ता यांनी हायकोर्टाला सांगितलं.
मिरज शासकीय कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटला गळती
Breaking News LIVE : सांगली : मिरज शासकीय कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटला गळती, 6 KLक्षमतेचा ऑक्सिजन प्लांट, लीकेज काढण्याचं काम सुरू, दुसरा प्लांट असल्याने रुग्ण सेवेवर परिणाम नाही
आज राज्यात 29,270 कोरोनाबाधित बरे होऊन घरी
Breaking News LIVE : आज राज्यात 29,270 कोरोनाबाधित बरे होऊन घरी तर नवीन 15,169 रुग्णांची नोंद, 285 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आढावा बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठा आरक्षणाचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक संपन्न, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा समाज आरक्षणावर मुख्य सचिव तुकाराम कुंटे आणि अजोय मेहता यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आढावा घेण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस मंत्र्यांची बोलावली बैठक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस मंत्र्यांची बोलावली बैठक,
सह्याद्रीवर काँग्रेस मंत्र्यांची बैठक सुरू,
मंत्रीमंडळ बैठक संपल्यानंतर नाना पटोले यांच्या उपस्थित काँग्रेस मंत्र्यांची बैठक,
पावसाळी अधिवेशन 7 जुलै रोजी घेण्याचा निर्णय
पावसाळी अधिवेशन 7 जुलै रोजी घेण्याचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवला जाणार, कोरोनामुळे 2 ते 3 दिवसाचे अधिवेशन होण्याची शक्यता