Breaking News LIVE : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द
Breaking News LIVE Updates, 03 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maratha Reservation : ...तर मला मुख्यमंत्री करा : खासदार संभाजीराजे छत्रपती
जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत काल (शुक्रवारी) छत्रपती संभाजी राजे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड शहरातील जनसंवाद कार्यक्रमाला संबोधन झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा असे सांगितले होते. त्यानंतर ओबीसी समाजातून आरक्षण का नको? असा प्रश्न एका तरूणाने विचारला. विशेष म्हणजे प्रश्न विचारणारा तरुण मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता, म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी त्या तरुणाला हीच मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची असल्याचं सांगितलं. या प्रश्नानंतर जनसंवाद कार्यक्रमात काही काळ थोडा तणाव तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला छत्रपती संभाजीराजे यांनी व्यासपीठावर समोर उभं करून समजावून सांगितलं.
याच तरुणाच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छत्रपती संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "जो प्रश्न तुम्ही मला विचारताय, तोच प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही तिथे विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा." असे यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले. मात्र हे वाक्य संपत असतानाच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली.
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल (शुक्रवारी) 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 16 हजारांच्या जवळ आल्या आहेत. विशेष म्हणजे काल मालेगाव आणि नंदुरबारमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर आज राज्यातील 34 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
राज्यात गुरुवारी 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 8,634 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आजपर्यंत 58,36,920 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,16,867 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील भारत केमिकल्स या कंपनीत स्फोट होऊन पाच कामगार जखमी
पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील भारत केमिकल्स या कंपनीत स्फोट होऊन पाच कामगार जखमी, अग्निशमन दलाच्या गाडीच्या मदतीनं आग आटोक्यात, जखमींवर तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, स्फोटाचे कारण अस्पष्ट
नाशिकच्या देवधर गल्लीतील वाडा कोसळला, वैश्य कुटुंबातील दोन महिला गंभीर जखमी
नाशिकच्या देवधर गल्लीतील वाडा कोसळला, वैश्य कुटुंबातील दोन महिला गंभीर जखमी, जोशी वाड्याचा नूतनीकरणाच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना वैश्य वाडा कोसळला, स्थानिकांच्या मदतीने महिलांना बाहेर काढले, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. मयत 43 वर्षीय भीमराव चंपती शिरसाट लोहा तालुक्यातील उमरा येथील रहिवासी. कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती
मुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण, 350 कामगारांचे बोगस लसीकरण करून लुटले 4 लाख 23 हजार रूपये
मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाले असल्याची घटना समोर आली असून दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या ॲटोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात 352 कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व कामगारांचे लसीकरण केले होते. यासाठी त्यांनी कंपनीकडून ४ लाख २४ हजार रूपये बिल आकारले. लसीकरणानंतर आरोपीने अनेक दिवस सर्टीफिकेट न दिल्याने कंपनी व्यवस्थापणाने याबाबत तगादा लावला होता. अखेर दोन कामगारांचे सर्टीफिकेट देत त्यावर लिलावती हॉस्पीटलचा उल्लेख असल्याने ॲंटोबर टेक्नोलॉजी कंपनी व्यवस्थापनाला यात काळेबेरे असल्याचा संशय आला. यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून तपास केला असता कामगारांचे केलेले लसीकरण बोगस असल्याचे तपासात समोर आले. आरोपी डाॅ मनीष त्रिपाटी, करीम आणि साथीदार या तिघांवर विविध कलमांव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन आरोपी मुंबई पोलीसांच्या कस्टडीमध्ये असून यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.