Breaking News LIVE : पिक विमा योजनेला 23 जुलैपर्यंतची मुदत वाढ
Breaking News LIVE Updates, 15 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भातील चर्चांना शरद पवार यांचं उत्तर
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेट घेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बातम्या चुकीचे असल्याचे शरद पवार यांनी आज (बुधवारी) स्पष्ट केलं. मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्याच्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काय येईल हे सर्वांनाच माहिती आहे. कारण, समोर 300 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाचाही उमेदवार असणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
आदित्य ठाकरेंचा निर्णयांचा धडाका; आता साहसी पर्यटन धोरणास मान्यता, काय आहे पर्यटन धोरण?
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल. या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र व आवश्यक सर्व अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील.
गणेशोत्सवासाठी कोकणात 2200 बसेस सोडणार, 16 जुलैपासून आरक्षण सुरु; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या नागकांसाठी विशेष ट्रेन्स आणि बस गणेशोत्सवादरम्यान सोडल्या जातात. यावर्षीही गणपती उत्सवासाठी कोकणात राज्य परिवहन महामंडळाच्या 2200 बसेस सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना 2200 बसेस सोडल्या जाणार असून त्यासाठी 16 जुलैपासून आरक्षण सुरु होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे.
नाशकात विवाहसोहळ्याला 'लव्ह जिहाद'चा रंग; जातपंचायतीच्या दबावामुळे लग्न रद्द झाल्याचा अंनिसचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी
हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये पार पडणारा हा सोहळा खरं तर सगळ्यांसाठीच एक आदर्श ठरणार होता, मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने तसेच काही धार्मिक कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे हे लग्नच रद्द झाले आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार जातपंचायतीच्या दबावामुळे झाल्याचा आरोप करत याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.
पिक विमा योजनेला 23 जुलैपर्यंतची मुदत वाढ
पिक विमा योजनेला 23 जुलैपर्यंतची मुदत वाढ. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यांनी कृषिमंत्री यांचीही याबाबत भेट घेतली होती. त्यानंतर ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
अरबीसमुद्रमध्ये कार्यरत असलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील 75 मृत कामगारांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची मदत
अरबीसमुद्रमध्ये कार्यरत असलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील 75 मृत कामगारांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची मदत, तोक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात घडली होती घटना, या चक्रीवादळामुळे 79 कामगारांचा मृत्यू झाला होता त्यापैकी 75 कामगारांची ओळख पटली, या 75 कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख असे एकूण ३ कोटी रुपयांची मदत
आज राज्यात 8,010 नवीन रुग्णांची नोंद तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त
आज राज्यात 8,010 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
कला दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड
कला दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीज हॉटेलमधून अटक केली. राकेश मौर्य असं त्याचं नाव असून तो लेबर युनियनचा अध्यक्ष आहे. अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी तो वकिलांना भेटायला पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
मुख्यमंत्री आणि शरद यांच्यामध्ये काय चर्चा झाली?
- अनिल देशमुखांपाठोपाठ खडसेंवर होत असलेल्या कारवाईवर झाली चर्चा
- नाना पटोले महाविकास आघाडीत अडचण निर्माण करणारी वक्तव्य करत असल्यानं नाराजी व्यक्त केली
- नाना पटोलेच्या स्वबळाच्या भाषेवर नाराजी
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कसं सामोरं जायचं? त्याची तयारी कशी करायची
- दिल्लीत होत असलेल्या अधिवेशानवर दोघांमध्ये चर्चा झाली
- कृषी कायद्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती त्याचे उमटणारे पडसाद
- विधानसभा अध्यक्षपद आणि मतदान प्रकिया