Breaking News LIVE : राज्यात सोमवारी 15, 277 रुग्णांना डिस्चार्ज, 7,603 रुग्णांची भर
Breaking News LIVE Updates, 12 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापूर, सांगली अजूनही हॉटस्पॉट
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत. राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.
कोल्हापूर, सांगलीत रुग्णसंख्या कमी होईना
कोल्हापूर जिल्ह्यात आज 1 हजार 193 नवीन कोरोना बाधित आढळले तर सांगलीत 927 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी कोल्हापुरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिकडे सांगलीतही 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. राज्यात दुसरी लाट ओसरत असताना या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. यामुळे प्रशासन चिंतेत असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भारतीय महिला ब्रिगेडचं जोरदार कमबॅक; दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी
भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आहे. विजयासह टीम इंडियांना तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं होते. या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 140 धावाच करता आल्या.
इंग्लंडकडून टम्सिनने चांगली फलंदाजी केली. तिने 50 चेंडूत 59 धावा केल्या. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडची पहिली विकेट 13 धावांवर गेली. त्यांनतर 106 वर 3 अशा भक्कम स्थितीत इंग्लंडचा संघ होता. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी पटापट विकेट सोडली. नाइट, डंकले, जोन्स, ब्रंट, विलियर्स एका मागोमाग आऊट झाले. इंग्लंडकडून टॅमी बीमाँटने सर्वाधिक 59, कर्णधार हेथर नाईटने 30, तर अॅमी जोन्सने 11 धावा केल्या. भारताकडून पूनम यादवने दोन, तर अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांची अनुकूलता नाही; लसीकरण झाले नसल्याने धोका असल्याचे मत
राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शाळा अद्याप सुरू करू नयेत, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान 18 वर्षापेक्षा जास्त मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचही ते म्हणाले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आजपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार
मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर सोमवारी पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु होणार आहे. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील. कारण दररोज कोविशील्ड लसीचे 40-50 हजार डोस दिले जातात. त्याच वेळी, कोवॅक्सिन लसीचे 15 हजार डोस दररोज दिले जातात. मंगळवारपर्यंत लसीचा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सध्या कोविशिल्डचे 85 हजार डोस आणि कोवॅक्सिनचे 50 हजार डोस उपलब्ध आहेत.
काँग्रेस नेत्यांची उद्या मुंबईत बैठक, बैठकीला प्रभारी एचके पाटील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार
काँग्रेस नेत्यांची उद्या मुंबईत बैठक, बैठकीला प्रभारी एचके पाटील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार, बैठकीत नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य, विधानसभा अध्यक्ष आणि संघटनात्मक कामावर होणार चर्चा
राज्यात सोमवारी 15, 277 रुग्णांना डिस्चार्ज, 7,603 रुग्णांची भर
आज 7, 603 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे.
NEET 2021 Exam Date: नीट परीक्षेची तारीख जाहीर, 12 सप्टेंबरला कोविड प्रोटोकॉल पाळून NEET ची परीक्षा होणार
कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे नीटची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 12 सप्टेंबरला कोविड प्रोटोकॉल पाळून NEET ची परीक्षा होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजल्यापासून NTA च्या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
बुलढाणा ABP माझाचा इम्पेक्ट, मलकापूर येथील स्मशानातील अघोरी पूजा केल्याचं प्रकरण. चार जणांवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
बुलढाणा ABP माझाचा इम्पेक्ट, मलकापूर येथील स्मशानातील अघोरी पूजा केल्याचं प्रकरण. चार जणांवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पूजा करवून घेणारा आशिष गोठी पोलिसांच्या ताब्यात, तीन मांत्रिक फरार. तीन मांत्रिकांना अटक करण्यासाठी मलकापूर पोलिसांचे पथक झारखंडमधील टाटानगरला जाणार. तपास अधिकारी संजय ठाकरे यांची माहिती.
नाशिक शहरात पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता
नाशिक शहरात पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता, दर बुधवारी शहरात कोरडा दिवस पाळला जाणार, रविवारपर्यंत पाऊस न आल्यास आठवड्यातील एक दिवस ड्राय डे, नाशिकच्या महापौरांची घोषणा, महापौर सतिश कुलकर्णी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक, बैठकीत पुढील आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय, गंगापूर धरणात 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक