Breaking News LIVE : वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली!
भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं.
गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा झटका
पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. . त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 794 रुपये मोजावे लागणार आहे. 24 फेब्रुवारी दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे.फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. त्या नंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घरघुती सिलेंडर आता 769 रूपयांवरून 794 रुपयांवर पोहचली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दमदार विजय; इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा काढल्या तर शुभमन गिलने 21 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांवर नाबाद राहिला.