Breaking News LIVE : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लाॅकडाऊनचा विचार नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'केंट' संपूर्ण जगभरात पसरणार : ब्रिटनच्या वैज्ञानिकाचा दावा
ब्रिटनच्या एका वैज्ञानिकाने कोरोना व्हायरसबाबात मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट केंट (Kent) संपूर्ण जगभरात पसरेल. यामुळे कोरोनव्हायरसविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर सुरु राहिल. ब्रिटनमधील जेनेटिक सर्विलिएन्स प्रोग्रामचे प्रमुखांनी सांगितलं की, "ब्रिटनच्या केंट परिसरात आढळलेला कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंटचा फैलाव जगभरात होण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोना विषाणूविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर चालेल."
देशाची आक्रमकता टिकवणं महत्त्वाचं : लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे
देशाच्या सीमांवर सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती आणि एकंदर वातावरण पाहता लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी देशाची आक्रमता आणखी बळावण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं. लष्करप्रमुखांचं वक्तव्य अशा वेळी करण्यात आलं आहे, जेव्हा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं सैन्य पॅगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन मागे हटत असल्याची माहिती दिली.
उदयनराजेंकडून शरद पवारांची भेट घेण्यामागचं मूळ कारण उघड
राष्ट्रवादीतून काढता पाय घेतल्यानंतर शरद पवारांची भेट घेण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे जाणार असल्याची माहिती समोर आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची थेट दिल्लीत होणारी भेट अनेक चर्चांना वावही देऊन गेली. अखेर खुद्द उदयनराजे यांनीच भेटीनंतर त्यामागचं खरं कारण उघड केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण शरद पवार यांच्या भेटीला आल्याचं उदयनराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. पवारांच्या दिल्लीती निवासस्थानी या भेटीदरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पवारांना भेटलात आता मोदींना भेटणार का, या प्रश्नावर हा विषय राजकारणाचा नाही असं म्हणत उदयनराजेंनी बगल देण्याचा प्रयत्न केला. ke
भांडुप परिमंडळात 28 हजार ग्राहकांची वीज तोडली
एकीकडे वाढीव वीज बिलामुळे सामान्य माणूस कर्ज काढण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे महावितरणने ग्राहकाकडून सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. फक्त भांडुप परिमंडळ क्षेत्रात महावितरणने 28 हजार पेक्षा जास्त ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले आहेत. महाराष्ट्रात असे लाखो ग्राहक आहेत ज्यांना अव्वाच्या सव्वा वीजबील सोपवण्यात आले आणि आता ते वीजबिल भरावे यासाठी सक्तीची वसुली केली जात आहे. गेल्या वर्ष भरात कोरोना संसर्गाची झुंजत असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला महावितरणने मोठा शॉक दिला. त्यानंतर अधिक खोटी आश्वासने दिली गेली विरोधकांनी आंदोलने केली मात्र महावितरण काही मागे हटले नाही. महावितरणाच्या केवळ भांडुप परीमंडळामध्ये शनिवार पासून आतापर्यंत तब्बल 28 हजार ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यात आलेली आहे.