एक्स्प्लोर

Breaking News LIVE :मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून  सुरू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Breaking News LIVE Updates, 8 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Breaking News LIVE :मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून  सुरू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Background

MPSC उमेदारांची सुधारित यादी वादाच्या भोवर्‍यात, मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती

राज्य सरकारनं एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी नुकतीच जाहीर केलेली सुधारीत यादी वादाच्या भोवर्‍यात अडण्याची शक्यता आहे. या यादीला आक्षेप घेणार्‍या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं ही यादी पुढील सुनावणीपर्यंत कार्यन्वित करू नये, असे निर्देश राज्य सरकारला देत या याचिकेची सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

राज्य सरकारनं एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी 23 जुलै रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली. त्यांनतर 26 जुलैला सुधारत यादी जाहिर केली. मात्र सुधारीत यादित पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं वगळण्यात आल्यानं या यादीला आक्षेप घेत गौरव गणेशदास डागा आणि इतर उमेदवारांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी राज्य सरकारच्या सुधारीत यादीला जोरदार आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला आर्थिक दुर्बल गटातून (इडब्ल्युएस) आरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तो निर्णय पूर्वलक्षीत प्रभावानं लागू केला. तसेच भरती प्रक्रीयेत एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी शासनानं आधी जी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली होती. त्याऐवजी शासनानं नव्यानं सुधारित यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं वगळण्यात आल्यानं अयिांत्रिकी प्रमाणेच भरती प्रकियेपासून वंचित रहाणार असल्यानं सुधारीत यादीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. यावेळी राज्य सरकारच्यावतीनं अ‍ॅड. व्ही.ए.थोरात यांनी भूमीका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयानं याचिकेची सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत तहकूब करत तोपर्यंत या यादीला स्थगिती दिली आहे.

Rahul Gandhi Twitter Account : राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते सस्पेंन्ड, कॉंग्रेस म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते. सहा दिवसांपूर्वी राहुल गांधीनी ट्वीट केले होते. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर राहुल गांधी इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत.  

यानंतर आता कॉंग्रेसच्या अधिकृत अकाऊंटवरून  ट्वीट करत या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये कॉंग्रेसने म्हटले आहे की, "राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील.. . जय हिंद."

Neeraj Chopra Wins Gold: नीरज चोप्राचा 'सुवर्णवेध', टोकियो ऑलिम्पिक भालाफेकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत देशासाठी पहिलं 'गोल्ड' मिळवलं

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्ण पदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची  कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 13 वर्षानंतरचं म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. 

याआधी आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.

ऑलिम्पिकमध्ये 13 वर्षानंतर सुवर्ण पदक

ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत. 

20:28 PM (IST)  •  08 Aug 2021

मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून  सुरू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून  सुरू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

20:07 PM (IST)  •  08 Aug 2021

कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोनाची दहशत उलथून टाकावी लागणार आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

19:16 PM (IST)  •  08 Aug 2021

सोलापूर शहरात निर्बंधांमध्ये  कोणताही दिलासा नाही

सोलापूर शहरात निर्बंधांमध्ये  कोणताही दिलासा नाही. शहराचा पॉझिटीव्हीटी रेट जवळपास 1 टक्के असताना देखील निर्बंध 'जैसे थे' आहे.राज्य शासनाकडून परवानगी मिळाली नसल्याने वेगळा निर्णय नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहरातील निर्बंध कमी होतील असे शुक्रवारी आश्वासन दिले होते .मात्र अद्याप तरी सोलापूर शहरातील नागरिकांना कोणताही दिलासा नाही

18:50 PM (IST)  •  08 Aug 2021

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये रविवारी रात्री 8 ते मंगळवार पहाटे 6 पर्यंत संचारबंदी

 श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीचा निर्णय  घेण्यात आला आहे.  सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता श्रावणातील प्रत्येक रविवारी रात्री 8 ते मंगळवार पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांवर फक्त नित्यसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना परवानगी राहणार आहे. ब्रम्हगिरी प्रदक्षिणा म्हणजेच फेरीला बंदी घालण्यात आली आहे.  यात्रेकरूंना हॉटेल, लॉजिंगमध्ये मुक्कामास बंदी आहे.  एकीकडे श्रावण महिन्यात मंदिर उघडा अशी मागणी पुरोहित संघाकडून जोर धरु लागली असतांनाच दुसरीकडे प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे

18:42 PM (IST)  •  08 Aug 2021

अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखांवर प्राणघातक हल्ला

अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अचलपूर येथील शिवसेना शहर प्रमुख पवन बुंदिले यांच्यावर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास काही युवकांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला शेतीच्या व्यवहारातून झाल्याचे समजते..यावेळी परतवाडा शहरातील पस्तीस चाळीस युवकांनी त्यांना घेरले आणि काही क्षणातच हल्ला चढविला. हल्ल्यात पवन राम समोर बुंदिले, योगेश योगेश जडीये, वीरेंद्र सिंगर आणि नितीन चंदेले गंभीर जखमी झाले. जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget