Breaking News LIVE : भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी
Breaking News LIVE Updates, 31 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात काय स्थिती असणार?
कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज?
मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यातआला आहे. तिकडे, लातूर आणि उस्मानाबादसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे. पाच सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व खाजगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबतचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. राज्यात शाळा सुरू करण्याबाबत सध्या विचार सुरू आहे, सोबतच शिक्षक दिनापूर्वी सर्व राज्यातील शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांना दिले होते.
त्या अनुषंगाने 5 सप्टेंबरपर्यंत राज्यातील शिक्षकांचे प्राध्यानक्रमाने लसीकरण करण्याबाबत सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे आता प्रत्येक गावात, शहरात आणि महापालिका हद्दीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड 19 लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने काही सूचना केल्या आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षणचा निर्णय जो पर्यंत होत नाही. तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नका राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा
ओबीसी राजकीय आरक्षणचा निर्णय जो पर्यंत होत नाही. तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नका, राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा, जितेंद्र आव्हाड यांची माहिती
औरंगाबाद : मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत औरंगाबादेत संघर्ष, मनसे कार्यकर्ते दहीहंडी साजरी करत असताना पोलिसांना घेतलं ताब्यात
औरंगाबाद : मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत औरंगाबादेत संघर्ष, मनसे कार्यकर्ते दहीहंडी साजरी करत असताना पोलिसांना घेतलं ताब्यात, औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर येथील प्रकार, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम
सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेत
नागपूर : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेत करण्यात आलं. वाडी नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज एक दिवस काम बंद आंदोलन केले.
पुण्यातील मावळ तालुक्यात मध्यरात्रीपासून संततधार सुरू
पुण्यातील मावळ तालुक्यात मध्यरात्रीपासून संततधार सुरू आहे. गेली काही आठवडे विश्राती घेतलेल्या पावसाने अचानक हजेरी लावली पण यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. कारण तालुक्यातील भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये असे निर्बंध लादले आहेत. त्यावरून ठाकरे सरकारविरोधात इतर राजकीय पक्ष असा सामना सुरू झालाय. डोंबिवलीत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी साजरी केली. राज्य सरकारने फक्त हिंदू सणांवर बंदी घातली, सरकारने कितीही बंधने आणली तरी भाजप हिंदू सण साजरे करण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.