Breaking News LIVE : अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील विरुळ (रोंघे) शिवारात बैलगाडीसह शेतकरी वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Breaking News LIVE Updates, 18 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
पुनर्विकासानंतर तळीये गाव राज्यातील आदर्श गाव; 13 हेक्टर वरती तब्बल 261 घरांचा पुनर्विकास होणार
रायगड जिल्ह्यातील तळीये गावाचा 13 हेक्टर वरती म्हाडा पुनर्विकास करणार आहे. फक्त तळीये गावाचं नाही तर सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडा करणार आहे. याआधी फक्त 63 घरांची म्हाडा पुनर्बांधणी करणार होती. या संदर्भात काल (मंगळवारी) मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला रायगड जिल्ह्यच्या पालकमंत्री अदिती तटकरे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होत्या. या गावाचा पुनर्विकास करताना राज्यातील एक आदर्श गाव म्हणून याकडे पाहिलं जाईल असं जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाही बोलताना म्हटलं आहे.
तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटल ही बांधल जाणार आहे. सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत. काही दिवसात ही घरं मुंबईत आणली जाणार आहेत. येत्या आठवड्याभरात रायगडचे जिल्हाधिकारी आणि म्हाडाचे अधिकारी तळीये गावाला भेट देतील आणि तेथील जागेचा मार्ग मोकळा केला जाईल. जागा हस्तांतरित झाल्यानंतर युद्धपातळीवर या घरांच्या पुनर्विकासाला गती दिली जाईल. नव्या तंत्रज्ञानाची ही घरे असणार आहेत. ज्या प्रकारे कोकणात वातावरण आहे. त्या सर्व वातावरणात ही घर टिकतील अशा स्वरूपाचे घर बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात तळीये गाव वसलेल असेल असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल आहे.
ज्यात काल 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.87टक्के आहे.
राज्यात काल 116 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0), धुळे (5), परभणी (41), हिंगोली (74), नांदेड (49), अमरावती (90), अकोला (30), वाशिम (5), बुलढाणा (45), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (2), चंद्रपूर (94) गडचिरोली (29) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील विरुळ (रोंघे) शिवारात बैलगाडीसह शेतकरी वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील विरुळ (रोंघे) शिवारात बैलगाडीसह शेतकरी वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड! स्थायी समितीची आजची बैठक संपताच एसीबीची कारवाई सुरू
पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड. स्थायी समितीची आजची बैठक संपताच एसीबीची कारवाई सुरू. स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतला. नेमकी कोणावर आणि किती रुपये ताब्यात घेतले याबाबतची माहिती गुलदस्त्यात. पण कारवाईने महापालिकेत खळबळ. स्थायी समितीची आज बैठक असल्याने इमारतीत ठेकेदारांची गर्दी आहे. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांनाही ताब्यात घेतलं आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर.
उमेश रघुनाथ खोसे सहशिक्षक जि.प.प्रा. शाळा जगदंबानगर कडदोरा, जिल्हा - उस्मानाबाद.
शेख खुर्शीद कुतबुद्दीन, जि.प.प्रा.शाळा असरअली ता. सिरोंचा जि. गडचिरोली
आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार आहे. परवापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा, तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग अधिक राहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी आज आॅरेंज अलर्ट, आज सकाळी 8.30 पर्यंत उमरखेडमध्ये 112 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशकातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण
खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीवरून ते पुण्यात आले आणि त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. चार दिवसांपूर्वी या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील घरात काम करणारा एक व्यक्ती ही पॉझिटिव्ह आढळला आहे.