एक्स्प्लोर

Breaking News LIVE : लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरला न्यायालयीन कोठडी

Breaking News LIVE Updates, 17 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरला न्यायालयीन कोठडी

Background

लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडविरुद्ध 151 धावांनी विजय; मोहम्मद शमी, केएल राहुलची निर्णायक खेळी
लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी मात केली आहे. मोहम्मद शमी, केएल राहुलची यांची खेळी निर्णायक ठरली. 

मराठा-ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्विकारणार नाही : पंकजा मुंडे
मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून, भाजप नेत्या पंकजा मुंडे या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जाहीर भाषणामधून जोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाजाच्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही. असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. बीडमध्ये आयोजित एका अभिनव कार्यशाळेत त्या बोलत होत्या. 

पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, "मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बीड जिल्ह्यानं नवा आदर्श घालून दिला पाहिजे. मी सांगते आजपासून कोणीही मला हार घालणार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही. त्यासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. तोपर्यंत फेटा बांधनार नाही. समाज बंधावांनी मराठा-ओबीसी वाद लावणारांपासून सावधान होणं गरजेचं आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा ​सामाजिक अभिसरणाचा आदर्श घेण्याची गरज आहे." आज बीड शहरामध्ये जिल्ह्यातील राजपुर बूथ कार्यकर्त्यांनी यांचे वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं, या ठिकाणी पंकजा मुंडे बोलत होत्या.

केंद्र सरकारने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे OBC समाजाची फसवणूक : शरद पवार
 केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसीसंबंधी यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की केंद्राने महत्त्वाचे पाऊल टाकले मात्र ही केंद्राने शुद्ध फसवणूक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

शरद पवार म्हणाले,  1992 साली नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात आरक्षणासंबंधी महत्त्वाचा निकाल दिला. 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही असा निर्णय दिला. मध्यंतरी आणखी एक दुरुस्ती करुन त्यात 10 टक्के वाढ करण्याची तरतूद घटनेत दुरुस्ती करुन दिली. राज्य सरकारने यादी तयार करुन ओबीसींना आरक्षण देऊ शकता असे सांगितले. पण प्रत्यक्षात याचा काही उपयोग होणार नाही. आज देशात जवळपास 90 टक्के राज्यात 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. त्यामुळे राज्यांना अधिकार दिले. यात तथ्य नाही. केंद्र सरकारने संबंध ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे. हे लोकांसमोर आणणे ही आमची जबाबदारी आहे. 

18:27 PM (IST)  •  17 Aug 2021

परभणी- येलदरी,सिद्धेश्वर प्रकल्प परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ

परभणी- येलदरी,सिद्धेश्वर प्रकल्प परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ, येलदरी 75.36 टक्के तर सिद्धेश्वर 85.78 टक्के भरले, असाच पाऊस सुरू राहिल्यास प्रकल्पातून होणार पाण्याचा विसर्ग वाढणार, पुर्णा पाटबंधारे विभागाकडून पुर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

17:43 PM (IST)  •  17 Aug 2021

स्वातंत्र्य सैनिक नागाबाई पंडित यांचे निधन, हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात होता सक्रिय सहभाग

हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी तथा आखाडा बाळापूर येथील ज्येष्ठ नागरिक नागाबाई किशनराव पंडित यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले.मृत्यू समयी त्या 95 वर्षाच्या होत्या.हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी आखाडा बाळापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुलगा,नातू पणतू असा मोठा परिवार आहे..नागाबाई पंडित या हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात सक्रिय होत्या त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

17:41 PM (IST)  •  17 Aug 2021

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरला न्यायालयीन कोठडी

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरला न्यायालयीन कोठडी. 8 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी 4 दिवस पोलीस कोठडी होती. जामिनासाठी डॉ. वैशाली वीरचा अर्ज दाखल.

16:51 PM (IST)  •  17 Aug 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी. लसीकरण पूर्ण झालेल्या भक्तांनाच 'ताजिया' मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी. सात ट्रक मधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी, एका ट्रकवर 15 जणांना मुभा. दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान मिरवणुकीची परवानगी. मिरवणुकीच्या शेवटी केवळ 25 जणांनाच कबरीस्तानात जाण्याची परवानगी.

16:26 PM (IST)  •  17 Aug 2021

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनकडून राज्य सरकारच्या शाळांची 15 टक्के फी कपात  करण्याच्या शासन निर्णया विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनकडून राज्य सरकारच्या शाळांची 15 टक्के फी कपात  करण्याच्या शासन निर्णया विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. राज्य शासनाने मागील आठवड्यात राज्यातील शाळांची 2021-22 मध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर राज्यातील संस्थाचालकांनी या शासन निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता संस्थाचालक संघटना या शासन निर्णया विरोधात याचिका दाखल केली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयातBaba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरुEknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget