एक्स्प्लोर

Breaking News LIVE : पुणे शहराजवळ असलेल्या पानशेत धरणामध्ये सँट्रो कार कोसळून अपघात

Breaking News LIVE Updates, 02 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : पुणे शहराजवळ असलेल्या पानशेत धरणामध्ये सँट्रो कार कोसळून अपघात

Background

Maharashtra Coronavirus | राज्यात आज तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद, फक्त मुंबईतचं 8,646 लोकांना लागण
राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात आज तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली असून लॉकडाऊनच्या छाया गडद होताना दिसत आहेत.

CoronaVirus | आमदार निवासात सापडला कोरोना रुग्ण! आमदार निवास कार्यकर्त्यांसाठी बंद
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे सध्याची परिस्थिती नाजूक बनली आहे. म्हणून मंत्रालयात सध्या आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरच्या  व्यक्तींना  प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आता मुंबईत असलेल्या आकाशवाणी या आमदार निवासांमध्येही अभ्यांगतांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसे परिपत्रक विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी काढले आहे.

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही; उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका
 राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशातील तरतूद गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली. प्रशासकाची नेमणूक करण्यापूर्वी जिल्हा पालकमंत्र्यांशी सल्लामसलत करण्याची अट रद्द करत त्याची गरज नाही, असं न्यायालयाने जाहीर केलेल्या निर्णयात म्हटलं आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका बसला आहे.

Corona Vaccination: मोठी बातमी... एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लसीकरण सुरु राहणार
 देशभरात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे.  सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआयनं माहिती दिली आहे.  






19:31 PM (IST)  •  02 Apr 2021

पुणे शहराजवळ असलेल्या पानशेत धरणामध्ये सँट्रो कार कोसळून अपघात

पुणे शहराजवळ असलेल्या पानशेत धरणामध्ये सँट्रो कार कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक महिला बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या गाडीच्या चालकाला वाचवण्यात यश आले आहे. पुणे पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण परिसरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

13:45 PM (IST)  •  02 Apr 2021

आमदार वायकर यांनी सोमय्या यांच्या विरोधात दाखल केला 100 कोटी रुपयांचा अबु्नुकसानीचा दावा


स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अबु्नुकसानीचा दावा दाखल केला आहे.  

10:44 AM (IST)  •  02 Apr 2021

कोरोनामुळे भिवंडी महापालिकेत सर्वसामान्य नागरिकांना बंदी 

भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढल्याने मनपा प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले असून शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी जाहीर केल आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेत येणारे सर्वसामान्य नागरिक यांच्या गर्दीवर देखील नियंत्रण राखण्यासाठी महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना  पुढील आदेश होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले आहे.

09:29 AM (IST)  •  02 Apr 2021

शासकीय नियम धाब्यावर बसवत बावधन मध्ये बगाड यात्रा



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रा काढू नये असे आदेश असताना देखील साताऱ्यातील बावधन येथे बगाड यात्रा काढण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या  बगाड यात्रेचा लौकिक आहे. 

08:34 AM (IST)  •  02 Apr 2021

चार राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत होणारा बाळुमामाचा भंडारा यंदा रद्द


कोरोना संकटामुळे चार राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत होणारा बाळुमामाचा भंडारा यंदा रद्द करण्यात आला आहे. आदमापूर येथील देवालय समिती आणि ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 5 एप्रिल ते 13 एप्रिल  बाळुमामाचा भंडारा उत्सव होणार होता. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोव्यातील लाखो भाविक येत असतात. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Embed widget