एक्स्प्लोर

Breaking News LIVE : जालना : कोरोना रुग्णाचे दवाखान्यातून पलायन, दुचाकीवरून जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू

Gokul Election Results 2021, Breaking News LIVE Updates, 3 May 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्सचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर...

Key Events
breaking news live updates maharashtra news latest marathi headlines 4 may 2021 Breaking News LIVE : जालना : कोरोना रुग्णाचे दवाखान्यातून पलायन, दुचाकीवरून जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू
Live Blog

Background

देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर...

अदर पुनावाला पुण्याचे, त्यांनी लसींबाबत महाराष्ट्राला झुकतं माप द्यावं : राजेश टोपे

अदर पुनावाला पुण्याचे असल्याने आणि सीरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात असल्याने पुनावाला यांनी महाराष्ट्राला झुकतं माप द्यायला पाहिजे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.  राज्य सरकारकडे लसीसाठी निधी आहे. सरकार खर्च करायला तयार आहे पण लस नसल्याने कमी गतीने लसीकरण करावे लागतेय, असं टोपे म्हणाले. 

पुढील काळात राज्यात अधिक वेगाने लसीकरण होणार असून लसी साठी लागणारी कोणतीही किंमत राज्य सरकार द्यायला तयार आहे असेही ते म्हणाले. सरकारकडे लसीसाठी निधी असून लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती कमी होत असल्याचं देखील आरोग्यमंत्री टोपे म्हणालेत.

दोन दशकांहून अधिकच्या वैवाहित जीवनानंतर बिल गेट्स- मेलिंडा यांच्या नात्याला तडा

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगभरातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असणाऱ्या बिल गेट् आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास आता इथवरच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. जीवनातील पुढच्या टप्प्यात आपण एकत्र जाऊ शकत नाही, असं म्हणत ही जोडी या निर्णयावर पोहोचली आहे. 

सध्याच्या घडीला या दोघांनीही परस्पर सहमतीनं हा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स यांनी ट्विट करत लिहिलं, 'आम्ही आमच्या नात्याबाबत फार विचार केला. अखेरीस हे नातं इथंच थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जीवनाच्या या पुढच्या टप्प्यावर आम्ही एकत्र पुढे जाऊ शकू याचा आम्हाला फारसा विश्वास नाही. आता आम्हा दोघांनाही आपआपला वेगळा असा वेळ हवा आहे. आम्ही जीवनाच्या नव्या टप्प्याच्या दिशेनं जाऊ इच्छितो'.

पालघरमध्ये नाशिकची पुनरावृत्ती टळली...! जम्बो ऑक्सिजन टॅंकचा वॉल झाला होता लिकेज, मात्र...

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 22 जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती आज संध्याकाळी 6 वाजता विक्रमगड तालुक्यात असलेल्या रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये होता होता टळली. अचानक रिव्हेरा कोव्हिड रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन टॅंकचा वॉल लिकेज झाल्याने ऑक्‍सिजन  गळतीला सुरुवात झाली. 

त्यामुळे एकच खळबळ माजली. तातडीने प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली. या रुग्णालयात 302 रुग्ण उपचार घेत असुन एकूण 80 रुग्ण ऑक्सिजन वर असल्याची माहिती अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉ.रामदास मराड यांनी दिली. या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली.   रिव्हेरा हॉस्पिटलचे मुख्य नोडल अधिकारी डॉ.प्रशांत राजगुरू यांनी तातडीने सर्व ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांना अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडरने जोडल्याने दुर्घटना टळली.

हा प्रकार घडताच तातडीने अग्निशमन दल आणि तज्ञ मंडळींना पाचारण करण्यात आलं. पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. हा प्रकार ऑक्सिजन लोड करताना वॉल थोडासा लीक झाल्याने घडला असल्याचं त्यांनी सांगितलं. 

23:16 PM (IST)  •  04 May 2021

जालना : कोरोना रुग्णाचे दवाखान्यातून पलायन, दुचाकीवरून जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू

जालना जिल्ह्यात कोविड रुग्णालयातुन पळून गेलेल्या कोरोना रुग्णांचा दुचाकी वरून जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. जालना शहरातील भाग्यनगर भागात राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीचा 4 दिवसापूर्वी कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता, त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज दुपारच्या सुमारास या रुग्णाने दवाखान्यातून पळ काढला. दरम्यान औरंगाबाद रोडवर दुचाकीवरून जाताना पाण्याच्या टँकर धडक बसल्याने या रुग्णांचा जागीच मृत्यू झाला, या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी वरून टँकर चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

20:51 PM (IST)  •  04 May 2021

गोकुळमध्ये अखेर सत्तांतर

गोकुळमध्ये अखेर सत्तांतर, 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागा. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळ मधील सत्ता संपुष्टात.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget