Breaking News LIVE : परभणीत 15 मिनिटांपासून वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस
Breaking News LIVE Updates, 18 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
चिंताजनक! नाशिक, नागपूरमध्ये आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद, तर पुण्यात सर्वात जास्त अॅक्टिव रुग्ण
राज्यात आज तब्बल 23 हजार 179 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातही चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, अमरावती, अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळा प्रशासन आणि नागरिकांसाठी आव्हान ठरणार आहे.
आतापर्यंत 3.64 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण, गेल्या 24 तासात 14 लाख लोकांना मिळाली लस
राष्ट्रव्यापी लसीकरणाच्या 61 व्या दिवशी, बुधवारपर्यंत देशात एकूण 3.64 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 12,10,498 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 1,92,710 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. बुधवारी 41,803 आरोग्य कर्मचारी आणि 63,617 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 53,542 आरोग्य कर्मचारी आणि 1,39,168 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 60 वर्षावरील 84,918 लाभार्थ्यांना आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या 2,20,160 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
Hemant Nagrale on Sachin Vaze Case | दोषींवर कारवाई होणारच- हेमंत नगराळे
सचिन वाझे प्रकरणाला गंभीर वळण मिळत असतानाच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. ज्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्त झाले. आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक परिषद घेतली. सध्याच्या घडीला मुंबई पोलीस ज्या परिस्थितीतून जात आहे, त्यावर प्रतिक्रिया देत राज्य शासनानं आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल नगराळे यांनी आभार व्यक्त केले. यानंतर त्यांनी थेट सचिन वाझे प्रकरणाला हात घालत दोषींवर कारवाई होणारच ही बाब स्पष्ट करत आपल्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. सध्याच्या घडीला पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित करत सर्वांकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
बुलढाणा जिल्ह्यात का कोरोना वाढणार नाही?
बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने रोज 600 रुग्ण वाढत असताना दररोज कोविड सेंटर मधून रुग्ण पळून जाउन जवळच्या हॉटेलात किंवा ढाब्यावर जेवण व मध्यप्राशन करून परत रात्री कोविड सेंटरमध्ये दाखल होतात. खामगाव येथील घाटपुरी कोविड सेंटर मधून असेच काही कोरोना रुग्ण दाखल असताना रात्री पळून गेलेत व राष्ट्रीय महामार्गावारिल एका धाब्यावर मनसोक्त मध्यप्राशन करून परत कोविड सेन्टरच्या दिशेने जात असताना नांदुरा येथील एक 55 वर्षीय रुग्ण अति मध्यप्राशन केल्याने महामार्गावर मध्यभागी पडलेला असल्याने काही समाजसेवकानी त्याला उचलून सामान्य रुग्नलायात भरती केले. ह्या कोविड रुग्णाच्या हे समाजसेवक अतिसंपर्कात आलेत. भर्ती केल्यानंतर संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना फोन करून माहिती दिल्यावर कळले की हा रुग्ण कोरोना पोजिटिव्ह असून गेल्या तीन दिवसांपासून घाटपुरी कोविड सेंटर येथे भरती करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्नसंख्या वाढत असताना अशा प्रशासनाच्या अशा निष्काळजी पणामुळे जिल्ह्यातिल कोरोना नियंत्रणात येत नसल्याच बोलले जात आहे. सदर कोविड सेंटर हे महामार्गालगत असल्याने व रुग्णाना चांगलं जेवण मिळत नसल्याने असे प्रकार नित्याचेच असल्याचं जवळ असलेल्या हॉटेल मधील कर्मचारी सांगत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात 695 जण कोरोनामुक्त
यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात 695 जण कोरोनामुक्त तर सात जणांचा मृत्यू. तर 325 नव्याने पॉझिटिव्ह.
सचिन वाझे प्रकरण : एनआयएकडून आणखी एक मर्सिडीज गाडी जप्त
मुंबई : एनआयएकडून आणखी एक मर्सिडीज गाडी जप्त करण्यात आली असून ही गाडीही सचिन वाझे वापरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनआयएकडून यासंदर्भात कसून चौकशी सुरु आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शन वेळेत उद्यापासून बदल होणार
कोल्हापूरचे श्री अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार, उद्यापासून दर्शन वेळेत होणार बदल, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा निर्णय
सचिन वाझे आणि परमबीर सिंग प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे आक्रमक
सचिन वाझे आणि परमबीर सिंग प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत तेच यांचे गॉडफादर असल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशी सह राजीनाम्याची मागणी केली आहे. नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर ही निशाणा साधत सचिन वाझेंची मर्सिडीज संजय राऊत यांच्या भावाच्या कार्यालया बाहेर काय करत होती? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं अस सांगून त्यांचा हमाम वेगळा आहे आणि आमचा हमाम वेगळा आहे असं विधान केलं आहे.