एक्स्प्लोर

Nashik News : कपडे धुण्याचं निमित्त झालं, आईच्या डोळ्यांदेखत एकुलता एक काळजाचा तुकडा हिरावला

Nashik News :आई कपडे धुवत असताना आदित्य हा पायथ्याशी असलेल्या डोहात आंघोळीसाठी उतरला.

Nashik News : काही दिवसांपासून धरणात, नदीच्या पाण्यात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. आईबरोबर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा दारणा धरणाच्या डोहात बुडून मृत्यू झाला. आईच्या डोळ्यांदेखत मुलगा बुडाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

पुण्यातील (Pune) खडकवासला धरणात बुडून दोन मुली बुडाल्याची घटना घडली होती. त्यानंतर नाशिकमध्ये वाडीवऱ्हे परिसरात धरणांत तरुण बुडाल्याची घटना घडली होती. आता इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील शिक्षक वसंत बबन नाठे यांचा एकुलता एक मुलगा आदित्य आईसोबत गेला असताना ही घटना घडली आहे. आदित्य हा आईबरोबर कपडे धुण्यासाठी दारणा धरणाकडे गेला होता. आई कपडे धुवत असताना आदित्य हा पायथ्याशी असलेल्या डोहात आंघोळीसाठी उतरला. आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य नदीत बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या चुलतभावांनी हे दृश्य पाहिले. 

दरम्यान त्यांनी कुटुंबियांना आवाज दिला तेव्हा, आदित्य गटांगळ्या खात होता. आईने लागलीच आदित्यकडे धाव घेतली. ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिने आरडाओरडा केला, मात्र त्याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. डोळ्यांदेखत मुलगा नदीत बुडत असल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात आदित्य खोलवर बुडाला होता. घटनेनंतर मालेगावहून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोंदे, अस्वली, नांदगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही पाण्याचा प्रवाह आणि अंधार पडत असल्याने रेस्क्यूत अडचण येत असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू सुरू केल्यानंतर सात वाजता आदित्यचा मृतदेह हाती लागला. शोकाकुल वातावरणात आदित्यवर गोंदे दुमाला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आईने फोडला हंबरडा

दोन दिवसांपूर्वीच मुकणे धरणाचे (Mukne dam) आवर्तन सोडण्यात आले आहे. नदी तुडुंब भरून वाहत असल्याने घरातील कपडे धुण्यासाठी नदीकाठावर महिलांची नेहमीच गर्दी असते. आदित्य हा आईसोबत दारणा धरणाजवळ गेला होता. सोबत असलेल्या चुलत भावांबरोबर तो अंघोळीसाठी गेला होता. कडक उन्हामुळे नदीत आंघोळ करण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. मात्र डोळ्यांदेखत मुलगा नदीत बुडत असल्याचे पाहून आईने मोठ्याने हंबरडा फोडला.

गंगापूर धरणात एकजण बुडाला... 

दरम्यान मित्रांसमवेत गंगापूर धरण (Gangapur Dam) येथील बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. यश रमेश चक्रधर असे मृताचे नाव आहे. यश हा घरातून जेवण करुन डान्स क्लाससाठी बाहेर पडला. पण, डान्स क्लासऐवजी भावासह चार-पाच मित्रांसमवेत तो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेला. तिथे दुपारी तीन वाजता ते पाण्यात उतरले. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Embed widget