एक्स्प्लोर
बोईसरमध्ये रेल्वे अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू, दोघे जखमी
रविवारची सुट्टी असल्याने दोन सख्ये भाऊ आणि त्यांचा एक मित्र असे तीन जण पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेले होते. पण हा सराव करताना ते बोईसर रेल्वे पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत होते. त्याचवेळी रेल्वे आल्याने ही घटना घडली.
पालघर : बोईसरमध्ये रेल्वे अपघातात 15 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रविवारची सुट्टी असल्याने दोन सख्ये भाऊ आणि त्यांचा एक मित्र असे तीन जण पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेले होते. पण हा सराव करताना ते बोईसर रेल्वे पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत होते. त्याचवेळी रेल्वे आल्याने ही घटना घडली.
धावताना पुलाच्याजवळ या तीनही मुलांना रेल्वेची जोरदार धडक बसली. या धडकेत चंदन अरविंद यादव या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ कुंदन अरविंद यादव हा 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेला आणखी एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement