एक्स्प्लोर

अनिल देशमुखांच्या पत्नीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

ईडीनं या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.

 मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिला आहे. देशमुख यांच्या पत्नीच्या मालकीच्या दोन मालमत्तांबाबत तूर्तास कोणतेही आदेश देऊ नयेत असे निर्देश हायकोर्टानं पीएमएलए न्यायिक प्राधिकरणाला दिले आहेत. मनी लाँडरींग कायद्यांतर्गत (पीएमएलए) अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात यावी, याकरता आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

ईडीनं या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड ही अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांच्या मालकिची आहे. आरती देशमुख यांच्या नावावर असलेला 1.54 कोटींचा वरळीतील फ्लॅट आणि कंपनीच्या नावावर धुतूम, उरण आणि रायगड इथं असलेली 2.67 कोटींची जमीनही ईडीनं जप्त केली आहे. या मालमत्तेवर आणलेली जप्ती उठवावी, अशी मागणी करत आरती देशमुख यांनी ज्येष्ठ वकिल विक्रम चौधरी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, या याचिकेवर इथं तातडीनं सुनावणी घेण्याची आवश्यकता काय?, अशी विचारणा हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना केली. 

तेव्हा, सदर प्रकरण हे पीएमएलए न्यायिक प्राधिकरणासमोर असून प्राधिकरणामध्ये एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे. ज्यापैकी एकाची कायद्याची पार्श्वभूमीचा असणं आवश्यक आहे. मात्र सध्या कार्यरत असलेल्या सदस्याला कायद्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तसेच सदर प्रकरणावर 9 डिसेंबर रोजी आदेश देण्यात येणार आहे. आमचा प्राधिकरणाच्या सुनावणीला विरोध नाही, परंतु प्राधिकरणाला अंतिम आदेश देण्यापासून रोखावे अशी विनंती, ज्येष्ठ वकिल विक्रम चौधरी यांनी हायकोर्टाकडे केली.  

त्याची दखल घेत पीएमएलए न्यायिक प्राधिकरणानं या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करावी, परंतु मुंबई उच्च न्यायालयातील या याचिकेवर निर्णय येईपर्यंत कोणताही अंतिम आदेश देण्यास प्राधिकरणाला मनाई केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जानेवारी 2022 पर्यंत तहकूब केलेली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्वाच्या बातम्या 

India Corona Vaccination : कोरोना लढाईत भारताची आघाडी, 'एवढ्या' लोकांचा पहिला डोस पूर्ण 

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाच्या अध्यादेशाला निवडणुकीच्या तोंडावर स्थगिती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?Pimpri-Chinchwad : पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी, शिवसैनिक बंडखोरीच्या पवित्र्यातABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुनही उमेदवारीची संधी हुकली , स्वीकृती शर्मा बंड करणार, अंधेरी पूर्वमधून अपक्ष लढणार
अंधेरी पूर्वमध्ये सेनेकडून मुरजी पटेलांना संधी? स्वीकृती शर्मांचं ठरलं, उमेदवार अर्ज भरणार, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
Rahul Kalate: चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
CJI DY Chandrachud : पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनीच पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
Embed widget