एक्स्प्लोर

बिग बी अमिताभ बच्चन यांना हायकोर्टाचा दिलासा, प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीवर तूर्तास हातोडा न चालवण्याचे पालिकेला निर्देश

Amitabh Bacchan : प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीवर तूर्तास हातोडा न चालवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहे.

मुंबई :  बॉलिवूडचे बिग बी, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिला आहे. बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ता  रूंदीकरणाच्या ताब्यात घेण्याकरता मुंबई महापालिकेनं बजावलेल्या नोटीसीला तात्पुरती स्थगिती देत यासंदर्भात तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं महापालिकेला दिलेत. मुंबई महापालिकेला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जागा वाढवून घेऊ शकते. मात्र मागील चार वर्षात महापालिकेनं याबाबत कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप बच्चन यांच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आलाय.

अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची पुढची भिंत ही समोरच्या संत ज्ञानेश्वर महाराज रस्ता रूंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत आहे. उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या या परिसरात संध्याकाळच्यावेळी या अरूंद रस्त्यामुळे ब-याचदा ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून साल 2017 मध्ये पालिकेनं या रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव मान्य केला होता. ज्याला आसपासच्या इमारतीतील लोकांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. अनेक सोसायटींनी आपली जागा पालिकेच्या स्वाधीन केली आहे. त्यामुळे प्रतिक्षाच्या भिंतीसह बंगल्याचा काही भाग ताब्यात घेण्यासाठी महापालिकेनं बच्चन यांना एप्रिल 2017 मध्ये दोन नोटीसा बजावल्या होत्या. याच नोटीसीविरोधात अमिताभ आणि जया बच्चन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या खंडपीठापुढे बुधवारी यावर सुनावणी झाली. न्यायालयानं बच्चन यांना नोटीसीबाबत महापालिकेकडे दोन आठवड्यात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यावर महापालिकेनं सहा आठवड्यात निर्णय घ्यावा. मात्र निर्णय घेतल्यानंतर तीन आठवडे त्यावर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसेच जर आवश्यकता असेल तर बच्चन यांची बाजू वकिलांमार्फत अथवा व्यक्तिशः ऐकून घ्यावी असेही हायकोर्टानं आपल्या निर्देशांत स्पष्ट केलं आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामाABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 12 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Embed widget