एक्स्प्लोर
नव्या नोटा अंध व्यक्तींनाच काय धडधाकट व्यक्तींनाही पटकन ओळखता येत नाहीत - हायकोर्ट
अंध व्यक्तींनाच काय धडधाकट व्यक्तींनाही नव्या चलनी नोटा चटकन ओळखता येत नाहीत, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालचाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी केली आहे.
मुंबई : अंध व्यक्तींनाच काय धडधाकट व्यक्तींनाही नव्या चलनी नोटा चटकन ओळखता येत नाहीत, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालचाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी केली आहे. दृष्टिहिनांना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या मोबाईल अॅपमध्ये नोटा चटकन ओळखता येत नसल्याचे उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
भारतीय चलनातील नव्या नोटा अंध व्यक्तिंना स्पर्शाने ओळखता याव्यात यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी नॅबच्यावतीने (National Association for Blind ) जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.
भारतीय चलनी नोटा ओळखण्यासाठी एक मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. मोबाईल कॅमेऱ्याखाली चलनी नोट ठेवली, की ती किती रुपयांची आहे, याचा ध्वनी संदेश मोबाईलमधून ऐकू येतो. परंतु काही वेळा शंभर आणि पन्नास रुपयांच्या नोटा हे अॅप चटकन ओळखू शकत नाही, असे या प्रात्यक्षिकादरम्यान समोर आले आहे.
अॅपमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या अॅपमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तर हे अॅप वापरता येईल का? आणि नोट स्कॅन करताना मोबाईल हलला तरी हे अॅप योग्य काम करेल का? असे सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement