एक्स्प्लोर
भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींच्या फोटोला हार घालून आरती
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील भाजपच्या उतावीळ कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला हार घालून आरती केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचं सांगत गडचिरोलीच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनीही निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र भाजपच्या प्रचारासाठी उतावीळ असलेल्या कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकरचा वापर करत मोदींच्या फोटोला हार घालून आरती केली.
मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर-गोमणी गट क्रमांक 34 मध्ये गोविंदपूर ग्रामपंचायतचा समावेश आहे. या ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या मथुरानगर बाजारात हा प्रकार घडला आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तीरमारे यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणाची तक्रार केली असून हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हटलं आहे. मुलचेराचे तहसीलदार ए. एस. कांबळे यांनी याबाबत चौकशी सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement