एक्स्प्लोर
Advertisement
'त्या' शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजप उचलणार; प्रविण दरेकरांची माहिती
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील तिसरीत शिकणाऱ्या प्रशांत बटुळे याने शाळेत 'अरे बळीराजा नको करु आत्महत्या' ही कविता सादर केली. पण, त्याच दिवशी त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या कुटुबीयांची भेट घेत तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजप करणार असल्याचं आश्वासन दिलंय.
अहमदनगर : आत्महत्या केलेले शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भाजप करणार असल्याचं आश्वासन, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिलंय. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली असती, तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळेच बटुळे यांनी आत्महत्त्या केल्याचं सांगत ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केलाय. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखांची मदत केली.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून मल्हारी बटुळे यांच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलाने एक कविता रचली आणि शाळेत सादर केली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच दिवशी त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या बटुळे कुटुंबीयांची भेट घेतली.
...तर हा प्रसंग घडला नसता : प्रवीण दरेकर
मल्हारी बटुळे यांच्या आत्महत्येवर बोलताना प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधाला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली असती तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळे मल्हारी बटुळे यांनी आत्महत्त्या केल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच ठाकरे सरकारची कर्जमाफी ही फसवी असल्याचं सांगत हे सरकार असंवेदनशील असल्यांचा आरोप दरेकर यांनी केलाय. यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मी आलो, पण सरकारकडून कोणीच आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. आता उद्यापासून यायला सुरुवात होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुलाकडून शाळेत 'बळीराजा नको करु आत्महत्या' कविता सादर, त्याच रात्री पित्याची आत्महत्या
काय आहे प्रकरण?
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमाननगर येथे तिसरीच्या वर्गात प्रशांत बटुळे हा विद्यार्थी शिकतो. प्रशांत बटुळेने बुधवारी (26 फेब्रुवारी) आपल्या शाळेत 'अरे बळीराजा नको करु आत्महत्या' ही कविता सादर केली. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये यासाठी त्याने ही कविता रचली होती. मात्र, त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष पिऊन जीवन संपवले. मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालं. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.
मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, व्यथित होऊन जीवन संपवायला आलेल्या शेतकऱ्याला नवी उमेद
प्रशांतच्या कवितेतल्या काही ओळी
शेतात कष्ट करुनही तुझ्या डोक्याला ताप,
बळीराजा नको करु आत्महत्या..
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे,
कसे उन्हात करतात शेती, पिक उगवणी करुन मिळतात पैसे
शेती करुनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा नको करु आत्महत्या
Special Report | चिमुकल्याकडून शाळेत बळीराजावर कविता सादर... अन् त्याच रात्री पित्याची आत्महत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
Advertisement