एक्स्प्लोर

आम्हाला त्याकाळी निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले आणि त्यांचे डिपॉझिट वाचले की आम्हाला आनंद व्हायचा : राम नाईक

अटलजी-अडवाणींची भाजप आणि मोदी-शाहांची भाजप यामध्ये फक्त पिढीचे अंतर आहे. मात्र वैचारिक भूमिका मात्र एकच आहे. तत्व महत्वाचे आहे आणि ते तत्व दोन्ही पिढीमध्ये एकच आहे, असे नाईक म्हणाले.

मुंबई : आम्ही जनसंघापासून काम सुरु केलं. जनसंघ त्यावेळी अगदी मिणमिणता दिवा होता. 1968 साली मी पूर्णवेळ काम करायचं ठरवलं. मी त्यावेळी संघटनमंत्री होतो. त्यावेळी आम्हाला उमेदवार मिळत नसायचे. उमेदवार मिळाले आणि त्यांचे डिपॉझिट वाचले तरी आम्हाला आनंद व्हायचा, असे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी संघटनमंत्री असताना स्कुटरवरून फिरायचो. पूर्ण मुंबई त्यावेळी पिंजून काढायचो. अशा स्थितीतून आज जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झालाय. याचा खूप आनंद आहे, असे नाईक म्हणाले. नाईक म्हणाले की, भाजपचं वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे संघटना आहे. ही संघटना विचारावर आधारित आहे. हरलो तरी विचारांसाठी हरलो आणि जिंकलो तरी उन्माद नाही, अशी विचारधारा असल्याने पक्ष मोठा झाला. इथं काम करण्याचा आनंद म्हणजे विचारधारेमुळे जास्त येतो. विचारांमुळे ताकद येते. आमच्या जुन्या नेत्यांचे विचार आमच्यात आहेत. त्या विचारांची ताकत अजूनही भाजपमध्ये आहे.  काँग्रेसमधील अशी ताकत कमी झाली. त्यामुळे काँग्रेसची आज ही अवस्था झाली आहे, असेही ते म्हणाले. अटलजी-अडवाणींची भाजप आणि मोदी-शाहांची भाजप यामध्ये फक्त पिढीचे अंतर आहे. मात्र वैचारिक भूमिका मात्र एकच आहे. तत्व महत्वाचे आहे आणि ते तत्व दोन्ही पिढीमध्ये एकच आहे, असे नाईक म्हणाले. मी भाजप अनुशासन समितीचा अध्यक्ष असताना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उमा भारती आणि मदनलाल खुराणा यांची हकालपट्टी केली होती. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर कारवाई न झाल्याबाबत विचारले असता नाईक म्हणाले की, हा पिढीमधील फरक आहे. पिढीमध्ये काही बदल होत असतात. पक्षात अनुशासन आहे. परंतु हे सगळं होत असताना आपली दिशा योग्य असावी, असेही ते म्हणाले. माझ्यावर मंत्री असताना काही आरोप केले गेले. मात्र ते सिद्ध होऊ शकले नाहीत. माझ्या विरोधात आरोप झाल्यानंतर मी व्यथित झालो होतो. मात्र मी घाबरलो नव्हतो. अटलजी आणि सगळेजण माझ्या मागे उभे होते. त्यावेळी कारगिल युद्धात आपले खूप जवान शहीद झाले होते. त्यावेळी मी शहीदांच्या परिवारांना पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सी दिल्या. या निर्णयाचं खूप कौतुक झालं, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget