एक्स्प्लोर

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन; 'या' चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

BJP : आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील  चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Maharashtra Politics मुंबई  : भाजपच्या (BJP) गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. आगामी विधानासभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या चार नेत्यांवर विधानासभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचेही बोलले जात आहे. 

नितीन गडकरी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले आहे. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे.

दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने (Congress) घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यातील सर्व जागांवर भाजपकडून विशेष मंथन करण्यात येत असून त्या अनुषंगाने भाजप तयारीला लागले आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget