एक्स्प्लोर

Rohit Pawar : अजित पवारांआधीच रोहित पवार भाजपमध्ये येणार होते, पक्षाला ब्लॅकमेल करून तिकीट मिळवलं; आ. राम शिंदेंचा आरोप

Ram Shinde On Rohit Pawar : गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी भाजपकडे हडपसर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितलं होतं असं आमदार राम शिंदे म्हणाले.

अहमदनगर : अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यानंतर आता भाजपचे आमदार राम शिंदे (  BJP Ram Shinde ) यांनी राष्ट्रवादीच्या रोहित पवारांवर ( Rohit Pawar ) निशाणा साधलाय. अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याआधी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते, रोहित पवारांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचं तिकीटही राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करून मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. आता राम शिंदे यांच्या आरोपावर रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Ram Shinde On Rohit Pawar : काय म्हणाले राम शिंदे?

भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवर आज टीका केली. ते म्हणाले की, आमदार रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या निवडणुकीचे तिकीट पक्षाला ब्लॅकमेल करूनच मिळवलं आहे. जिल्हा परिषदेचे तिकीट देता की मी भाजपात जाऊ अशी थेट धमकीच त्यांनी 2017 साली राष्ट्रवादी पक्षाला दिली होती. 

Rohit Pawar Election : 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मागितलं

आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टिका करताना सांगितलं की, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पावर यांनी डपसर मतदारसंघातून भाजपकडे तिकीट मागितलं होतं. रोहित पवार हे भाजपाच्या तिकिटासंदर्भात तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते. 

Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांएवढं मेरिट आहे का? 

अजित पवार हे गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात आहेत, रोहित पवारांकडे तेवढं मेरिट आणि क्षमता आहे का? असा सवाल राम शिंदे यांनी विचारला आहे. तर कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही असा खोचाक सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिला. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून रोहित पवारांवर जोरदार टीका सुरू आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका करताना ते कितीही जन्म घेवोत, त्यांना अजित पवार होता येणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, अजित पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. मला अजित पवारांसारखं व्हायचं नाही. मी राजकारणात नेता बनण्यासाठी आलो नाही तर विचार जपण्यासाठी आलोय. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 11 March 2025 : 6 PMABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 11 March 2025Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 PmPrakash Solanke Statement | मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो; सोळंकेंचं वक्तव्य, अडचणी वाढणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
Embed widget