2025 मध्ये पाकिस्तानचे 4 तुकडे होणार, भाजप खासदार निशिकांत दुबेंचा मोठा दावा, म्हणाले, सरकार हल्ल्याचा बदला घेणार
2025 सालानंतर पाकिस्तान एक देश म्हणून पृथ्वीवरून पुसला जाईल, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikanrt Dube) यांनी केला आहे.

BJP mp on Pahalgam Terror Attack : 2025 सालानंतर पाकिस्तान एक देश म्हणून पृथ्वीवरून पुसला जाईल, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikanrt Dube) यांनी केला आहे. 2025 मध्येच पाकिस्तानचे 4 तुकडे होणार असल्याचे दुबे म्हणाले. तसेच कोणत्याही किंमतीत मोदी सरकार (Modi Govt) या हल्ल्याचा बदला घेईल, असे दुबे म्हणाले.
यंदा पाकिस्तानचे चार भाग केले जाणार
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील महेशमारा रेल्वे हॉल्ट स्टेशनच्या पायाभरणीसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना निशिकांत दुबे म्हणाले, की यंदा पाकिस्तानचे चार भाग केले जातील. पहलगाम घटनेवर बिहारमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबाबत जे संबोधित केले त्याचा संदेश दूरगामी आहे.
दावा पूर्ण झाला नाही तर भाजप खोटी आश्वासने देतो असे लोक म्हणू शकतात असे निशिकांत दुबे म्हणाले.
काश्मीरचा भाग आम्ही नक्कीच परत घेऊ
पाकिस्तानने आमच्याकडून घेतलेला काश्मीरचा भाग आम्ही नक्कीच परत घेऊ. याशिवाय पाकिस्तानचे बलुचिस्तान, पश्तुनिस्तान आणि पंजाब या स्वतंत्र देशांत विभाजन केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील. हे मी पूर्ण विश्वासाने सांगत असल्याचे दुबे म्हणाले. जर या वर्षानंतर पाकिस्तानचे अनेक तुकडे झाले नाहीत, तर तुम्ही भाजपवाले खोटे म्हणून सांगण्यास मोकळे व्हाल असेही दुबे म्हणाले. पाकिस्तान संपुष्टात येईल’, ही मोदींची हमी आहे. याच आत्मविश्वासामुळे ते देशाचे पंतप्रधान झाले आहेत असे दुबे म्हणाले.
पंतप्रधानांनी दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची शपथ घेतली - निशिकांत
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत निशिकांत दुबे म्हणाले, "पाकिस्तानी सैन्याने निवडकपणे भारतीयांची, विशेषत: हिंदूंची हत्या केली आहे. मोदी सरकार कोणत्याही किंमतीत या हल्ल्याचा बदला घेईल असे दुबे म्हणाले. रेल्वे थांब्याच्या पायाभरणी समारंभापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे खासदा दुबेर म्हणाले, की आज देशाचे नेतृत्व एका पंतप्रधानाच्या हातात आहे, जो आपल्या कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने देश आणि जगात ओळखला जातो. त्यांनी बिहारच्या मातीतून दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांचा नायनाट केला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीरचे संपूर्ण कुटुंब परदेशात आहे असे दुबे म्हणाले. दरम्यान, कोणत्याही किंमतीत मोदी सरकार (Modi Govt) या हल्ल्याचा बदला घेईल, असा विश्वास देखील दुबे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























