लावालावी करणारे संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?, नारायण राणेंचा खडा सवाल
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय.
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय. सिंधुदुर्ग येथील सभेत बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? हेच समजत नाहीत. संजय राऊत जसं दाखवतात तसे नाहीत. लावालावीचं काम करतात त्यामुलेच त्यांचं नाव संजय राऊत आहे.' देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य कधीच तोडलं नाही, असेही राणे म्हणाले. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच असल्येचं मत राणे यांनी यावेळी व्यक्त केलं.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर काय म्हणाले राणे -
संसदेत बोलताना अडखळल्यानंतर ट्रोल झालेले राणे यांनी त्यावरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला प्रश्न समाजाला होता, अधक्ष्याना वाटलं तो प्रश्न समजला नसेल असा वाटलं म्हणून अध्यक्षनी तो पुन्हा सांगितला. जे काही करायचे आहे ते करा.. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. अधिवेशनमध्ये कायदे करणारी बिल पास होत आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असेही राणे म्हणाले.
विनोद तावडेंबद्दल काय म्हणाले?
विनोद तावडे हे महासचिव आहेत ते महाराष्टापुरते नाहीत. देवेंद्र फडणवीसांचे पंख छायला दिल्लीत त्यांना पाठवलं नाही. पंख छाटायला विनोद तावडे एकटे नाहीत, त्यांच्यावर नड्डा, मोदी, अमित शहा आहेत त्यामुळे तसं होणार नाही, असे राणे म्हणाले.
मुंबई मनपामध्ये सत्ता बदल होईल - राणे
तीन पक्षांना निवडूक नको.. आजच मरण उद्यावर ढकलण्याचे काम सुरु आहे. मुंबई मनपामध्ये दिसेल असे काम करू, असे राणे म्हणाले. मला 55 वर्ष राजकारणात झाली त्यामुळे मुंबई मनपा मध्ये सत्ता बदल होईल मात्र पत्रकाराना मनपा संदर्भात प्लॅन सांगून सुरुंग लावायचं नाही त्यामुळे सांगणार नाही, असेही त्यांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्षांना टोला -
सतीश सावंत कोण आहेत संचयणीत घोटाळा केला तेच ना? असं म्हणत नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्षांना टोला लगावला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागेल, असाही विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात काही ठिकाणी नगरपालिकेला शिवसेना, काँगेसला उमेदवार मिळत नाहीत. राज्यातल आताच सरकार चालत नाहीत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. राज्याचा विकास रखडलाय, असेही राणे म्हणाले.
सिंधुदुर्गमध्ये अनेक योजना येणार - राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21, 22, 23 जानेवारी रोजी उद्योगाच्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात आणणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं, मात्र रत्नागिरीत तसे नेते नाहीत, वादावाद तो रस्ता तसाच राहिला, असे राणे यांनी सांगितलं.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live