एक्स्प्लोर
भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा
भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

नागपूर: भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. नाना पटोले दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सोपवला. https://twitter.com/NANA_PATOLE/status/939039327736098816 नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी प्रश्नावरुन त्यांनी अनेकवेळा सरकारविरोधी भूमिका घेतली होती. नुकतंच भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनासाठी नाना पटोलेच यांनी सिन्हांना हाक दिली होती. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. नाना पटोले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज न ेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. कोण आहेत नाना पटोले?
- 54 वर्षीय नाना पटोलेंचा जन्म भंडाऱ्यातील शेतकरी कुटुंबात झाला
- शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठं काम, मतदारसंघात नानाभाऊ म्हणून परिचित
- 1990 साली भंडाऱ्यातील सांगडीतून जिल्हा परिषदेवर निवडून गेले
- 1999 पासून सलग तीन वेळा साकोली मतदारसंघातून विधानसभेवर गेले
- काँग्रेसचे उपनेते म्हणूनही काम, 2014 आधी पक्षाच्या धोरणावर नाराज होऊन बाहेर
- भंडारा-गोंदिया मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली
- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलांचा 1 लाख 49 हजार मतांनी पराभव केला
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























