नवाब मलिक माझं नाव घेऊन का बोलत नाहीत? सुरेश धसांचा खडा सवाल
नवाब मलिक यांनी माझ्या बाबतीत बोलताना नाव घेऊन बोलावं, ते मंत्री आहेत त्यांना हे शोभणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
बीड : जर तुमचा माझ्यावर आरोप आहे तर तुम्ही माझं नाव का घेत नाहीत? असा प्रतिप्रश्न भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केलाय. आष्टी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मलिक हे आज आष्टीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सभेमध्ये बोलताना सुरेश धस यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांच्या या टीकेवर धस यांनी प्रतिप्रश्न केलाय. तसेच नवाब मलिक हे फेक वक्तव्य करण्यासाठी राज्यात फेमस असल्याचही धस यावेळी म्हणाले.
आम्ही काय भाजीपाला नाही
वानखेडे प्रकारणापासून नवाब मलिक हे अनेकांवर आरोप करत आहेत. जेलमध्ये घालण्याची भाषा करत आहेत. मात्र आम्ही काय भाजीपाला नाही आहोत. त्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत बोलताना नाव घेऊन बोलावं, ते मंत्री आहेत त्यांना हे शोभणार नसल्याचे धस म्हणाले. राज्यात सरकार त्याचं आहे, ते कारवाई करू शकतात. भाजपचे सरकार असताना त्यांनी राज्यात खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, हळूहळू त्यांचे सगळे बाहेर काढू असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यावर बोलताना धस म्हणाले की, त्यांनी आरोप करू नयेत, अशी वक्तव्य केल्यामुळे त्यांना कोर्टासमोर माफी देखील मागावी लागली आहे,. हा त्यांचा इतिहास असल्याचे धस म्हणाले.
आम्ही कोणतेही चौक पाडले नाहीत
आम्ही जनतेच्या पोटात घुसतो. आम्ही काय करतो ते 19 तारखेला जनता त्यांना दाखवून देईल, त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करू नये. याच उत्तर जनता विरोधकांना देणार असल्याचे सुरेश धस म्हणाले. आम्ही कोणतेही चौक पाडलेले नाहीत. त्याठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे करण्यासाठी त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी नव्याने चौक बांधण्यात येणार आहेत. रस्त्याच रुंदीकरण हे लोकांच्या परवानगीने केलेलं असल्याचे धस म्हणाले. ज्या लोकांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांना मतदान करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे कोणीही आरोप करू नयेत. राज्य निवडणूक आयोगाने त्यांना मतदानाची परवानगी दिलेली आहे. निवडणूक लागल्यानंतरच पत्रकार परिषदा घेतल्या जातात. ईडीकडे तक्रारी केल्या जातात, त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होणार नाही. माझी औकात लोकांना माहीत आहे, त्यामुळे 19 तारखेला जनता याचे उत्तर देईल असे धस यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: