एक्स्प्लोर

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाबाहेर निलेश राणेंचा दंगा, पोलिसांशी घातली हुज्जत

भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. आज, सत्र न्यायालयाने यावर निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत. 

Nitesh Rane :  एकीकडे देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला असून दुसरीकडे सिंधुदुर्ग येथे मात्र एक दुसराच गोंधळ सुरु आहे. भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे गाडीत बसून निघण्याच्या तयारीत होते. तेव्हाच पोलिसांनी नितेश राणेंची गाडी अडवली. यावेळी सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर नितेश यांचे भाऊ आणि खासदार निलेश राणे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. दरम्यान अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता होती पण सुप्रीम कोर्टानं 10 दिवसांची मुदत दिल्यानं पोलीस त्यांना अटक करु शकत नाहीत अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. पण पोलिसांनी नितेश यांची गाडी अडवली असता निलेश यांनी पोलिसांसोबत घातलेला गोंधळाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार  वादात अडकले आहेत. हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी सुरु आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतला. ज्यानंतर कोर्टाने आपला निर्णय आज (मंगळवारी) दुपारी सुनावण्यासाठी राखून ठेवला होता. दरम्यान कोर्टाने आज नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी सुप्रीम कोर्टानं त्यांना 10 दिवसांची मुदत दिल्यानं पोलीस त्यांना अटक करु शकलेले नाहीत.

आज काय घडलं कोर्टात?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज कोर्टात नितेश राणेंचा जामीन मेंटेनेबल नाही त्यामुळे फेटाळला असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे प्रथम न्यायालयाला शरण आलं पाहिजे होतं, मग अर्ज करणे अपेक्षित होते. न्यायालयात शरण न येताच जामीन अर्ज केला, त्यामुळे तो मेंटेनेबल नाही. असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सुप्रीम कोर्टाने दहा दिवसांची मुदत दिली आहे त्यामुळे कोठडी देता येणार नसतानाही पोलिसांनी त्यांची गाडी अडवली ही पोलिसांची दादागिरी आहे. तसंच हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, असं ते म्हणाले.   

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
Embed widget