Chandrakant Patil on Maharashtra Government : राज्य सरकारच्या मेंदूला लकवा, चंद्रकांत पाटलांची टीका
राज्य सरकारकडून कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. सरकारच्या हाताला नाही तर मेंदूलाच लकवा मारला आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय
सांगली : "या सरकारची बुद्धी चालत नाही. तसेच कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर मेंदूलाच लकवा मारला आहे. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
सांगली येथे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे. आताचे सरकार कोणतेच निर्णय घेत नाही. एसटी आंदोलनापासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासारखे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. परंतु, हे सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नाही. या सरकारच्या हाताला नाही तर मेंदूलाच लकवा मारला आहे."
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी फायदे द्यावेत
एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दीड महिन्याभरापासून संप सुरू आहे. या संपावरही चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांचा संप खूप दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु, या आंदोलनावर राज्य सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. जर कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेता येत नसेल तर त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ देण्यात यावेत."
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान, चंद्रकांत पाटील यांची टीका
- भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील पक्षांची चढाओढ : चंद्रकांत पाटील
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा : चंद्रकांत पाटील