एक्स्प्लोर

बैठकीत फडणवीस प्रचंड रागावले, त्यांना खुश करण्यासाठी भाजप नेते 'जरांगें'वर तुटून पडले; रोहित पवारांचा दावा

Rohit Pawar : फडणवीस यांना खुश करण्यासाठीच भाजप नेते मनोज 'जरांगें'वर तुटून पडले होते असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, फडणवीस यांना खुश करण्यासाठीच भाजप नेते मनोज 'जरांगें'वर तुटून पडले होते असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. 

दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली, त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस प्रचंड रागावले होते. त्यामुळं काल फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठीं भाजपचे नेते तुटून पडले होते. या माध्यमातुन टार्गेट दुसऱ्याच कुणाला तरी करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलल्यावर एसआयटी चौकशी केली जाते. मात्र, पेपरफुटी ज्यानी केली त्यांच्यावर कारवाई होतं नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांचा यामागे हात आहे, असेही रोहित पवार म्हणाले आहेत. 

फक्त राजकारण होत आहे...

अधिवेशनात मी माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बैठक आयोजीत करण्यात आली आहे. असं सतत होतांना पाहिला मिळत आहे. यांना फक्त राजकारण करायचं आहे त्यामुळं आम्हाला बैठकीला बोलवलं नाहीं, असे म्हणत पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. 

लोकं सोबत नसल्याने भाजप चिंतेत...

राजकिय षडयंत्र भाजपसोडून दुसरं कोणी करत नाही. नेत्याच्या विरोधात बोललं की एसआयटी लागते. पूर्ण देशात किंवा महाराष्ट्रात भाजपला सत्ता येईल असं वाटतं नाहीं. त्यामुळं त्यांचे सातत्यानं दौरे वाढले आहेत. आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षण मुद्दा संसदेत सुटू शकतो. माञ तिथं कूणी विषय काढत नाही. सध्या लोकं त्यांच्या बाजूने नसल्यामुळे भाजप चिंतेत आहे. 

गुजरात अमली पदार्थ कारवाईवर प्रतिक्रिया...

1 लाख 20 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ गुजरातमध्ये सापडले आहेत. महिन्याच्या अंतरात 2 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडत असतील तर हे गंभीर आहे, असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. 

अजित पवारांना महायुतीत चार जागा मिळतील...

चारच्या आसपास जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामधे शिरूर लोकसभा मतदारसंघ नसेल, कारण तो शिवसेनेला जाणार आहे. अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मागणी करत होते. मात्र, दिलीप वळसे पाटील कुणाचंच ऐकत नाहीत. शरद पवार याचं देखील त्यांनी ऐकलं नाही, असे रोहित पवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Rohit Pawar On Baramati Loksabha Election : बारामतीच्या आत्या विरुद्ध काकीच्या लढाईवर रोहित पवार पहिल्यांदा स्पष्टच बोलले, म्हणाले...

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget