(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhir Mungantiwar : राज्यपाल भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात ही सुपिक डोक्यातून नापिक कल्पना, मुनगंटीवारांचा पटोलेंना टोला
राज्यपाल भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात ही नाना पटोले यांच्या सुपिक डोक्यातून नापिक कल्पना आली आहे. या कल्पनेला जनता भीक घालत नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं
Sudhir Mungantiwar : राज्यपाल भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात ही नाना पटोले यांच्या सुपिक डोक्यातून नापिक कल्पना आली आहे. त्यांच्या या कल्पनेला जनता भीक घालत नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. नाना पटोले यांनी राज्यपाल भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या टीकेला मुनगंटीवार यांनी आज प्रत्युत्तर दिलं. आज सुधीर मुनगंटीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि प्रधान सचिवांची भेट घेतली. उद्या होणाऱ्या अधिवेनादरम्यान, सुरक्षेच्या व्यवस्थेच्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. बहुमत चाचणीच्या आसन व्यवस्थेसह निर्भयी वातावरणात बहुमत चाचणी व्हावी, यााबाबत चर्चा केल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, पुरेशी व्यवस्था ठेवण्याचे आश्वासन यावेळी मुनगंटीवार म्हणाले. जशी प्रश्नपत्रिका असेल तशी उत्तर पत्रिका देऊ असेही ते म्हणाले. जे लोक धमक्या, गुंडगिरीचा भाषा करत आहेत, त्याबाबत गंभीरतेनं लक्ष द्यावं, सर्वांना लोकशाहीचा अधिकार बजावता यावा असेही ते म्हणाले. तुमचे आमदार तुम्हालाटिकवता आले नाहीत, तुम्ही राज्यपालांवर टीका का करता? असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात कोणाचाही गुंडगिरी चालणार नाही. जे लोक हारले आहेत ते आरोप करत असल्याचे ते म्हणाले. भाजपला एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की, हा महाराष्ट्र आहे. याठिकाणी आंतकी, गुंड प्रवृत्ती चालणार नाही. उद्याची बहुमत चाचणी ही निर्भय पद्दथीनं व्हावी याबाबत उपाध्यक्ष आणि प्रधान सचिवांशी चर्चा झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.