जमत नसेल तर आराम करा, आम्हाला संधी द्या ; प्रवीण दरेकर यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
जमत नसेल तर आराम करा, आम्हाला संधी द्या, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.
रायगड : जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक जवळ आली असून पोलादपूरवासीय हे परिवर्तनाच्या प्रयत्नात आहेत. जमत नसेल तर आराम करा, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.
पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपला कौल दिला असून दुसऱ्या टप्प्यात देखील आपल्याला मताधिक्य मिळेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना संधी देण्यात आली होती. परंतु आज पोलादपूरवासीय परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
पोलादपूरचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा प्रयत्न करत असून महाबळेश्वर-पोलादपूर- दापोली मार्ग करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करीत पोलादपूरवासीय हे परिवर्तनाच्या प्रयत्नात आहेत. जमत नसेल तर आराम करा, आम्हाला संधी द्या असा टोला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रवीण दरेकर यांनी लगावला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रवीण दरेकरांचे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई जिल्हा बँकेवरचे वर्चस्व संपुष्ठात आणले आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली आहेत. उपाध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत.
मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित व्यूहरचना करत भाजपच्या प्रवीण दरेकरांचं वर्चस्व मोडून काढण्याचं ठरलं. त्याच पद्धतीने नियोजन करत आता सिद्धार्थ कांबळेंना अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या