महाविकास आघाडीकडून जुलमी राजवटीचे काम ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
महाविकास आघाडी सरकारकडून जुलमी राजवटीचे काम केले जात आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे.
![महाविकास आघाडीकडून जुलमी राजवटीचे काम ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल bjp leader pravin darekar criticism on maharashtra government over arrested navnit rana and ravi rana महाविकास आघाडीकडून जुलमी राजवटीचे काम ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/23/471c6a0bfa8708032de611d5eef38d67_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pravin Darekar : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबईतील खार पोलिसांनी अटक केली आहे. राणा दाम्पत्याच्या या अटेवरून आता परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. " मुंबई पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर राणा दाम्पत्य मातोश्रीबारेह गेले नाही. त्यांनी कायद्याचे पालन केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला अटक करणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारकडून जुलमी राजवटीचे काम सुरू आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना आजची रात्र पोलीस ठाण्यातत काढवी लागणार आहे. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं आहे.
राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझासोबत संवाद साधाला. ते म्हणाले, काल मोहित कंबोज यांची गाडी भर रस्त्यावर फोडली. परंतु, त्या हल्लेखोरांवर काही कारवाई करण्यात आली नाही. परंतु, कायद्याचे पालन करणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. शिवाय आज त्यांना पोलीस ठाण्यातच ठेवण्यात येणार आहे. ही बाब योग्य नाही. राज्यात सध्या दडपशाही सुरू आहे. राणा दाम्पत्याला अटक केली त्याचा भाजपतर्फे निषेध व्यक्त करतो. राणांना पोलीस ठाण्यात ठेवण्याची गरज नव्हती. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे."
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार यांनी संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच अज्ञात अशा 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी अॅम्ब्युलन्स आणली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
Navneet Rana : राणा दाम्पत्याला अटक, आजची रात्र खार पोलीस ठाण्यात जाणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)